म्हणाैनि कारण सत्समागम । तेथे नलगे वित्पत्तीश्रम ।।1।।

17 May 2023 12:36:12
 
 

saint 
 
श्रीदासबाेधाचा सातवा दशक चतुर्दश म्हणजे चाैदा ब्रह्मांचा आहे. वेदांतामध्ये ॐ, खं, सर्व खल्विदं, चैतन्य, सत्ता, साक्ष, शब्द, सगुण, निर्गुण, वाच्य, अनुभव, आनंद, तदाकार व अर्निर्व्याच्य अशी चाैदा ब्रह्मे सांगितली आहेत.शुद्ध परब्रह्मस्वरूप जाणण्यासाठी ही चाैदा ब्रह्मे पार करून ज्ञान स्थिर करावे लागते. या दशकामध्ये श्रीसमर्थांनी आपल्या शिकवणीचा संपूर्ण सारांश सांगून हा मार्ग सांगितला आहे. यातील पहिला समास ‘मंगलाचरण’ हा आहे.यामध्ये श्रीसमर्थांनी सुरुवातीला गजाननाला वंदन केले आहे. गणेश हा सर्व ज्ञानवंतांचा मूळ पुरुष, सर्व विद्या, गद्य, पद्य आणि कला यांचे उगमस्थान आहे. सृष्टीच्या सुरुवातीपूर्वी असणारा आणि शेवटानंतरही राहणारा असा हा स्वयंभू मूळ पुरुष आहे आणि सर्व कर्तृत्वाचेही मूळ स्थान आहे.
 
त्याच्या पूर्ण प्रकाशाने ज्ञानसागराला भरती येते हे सांगताना श्रीसमर्थ ‘विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा’ अशा समर्पक शब्दात त्याची स्तुती करतात.त्यानंतर ते शारदेचे स्तवन करतात. शारदा स्वत: अद्वैताची खाण असूनही द्वैतालाही जन्म देते आणि ती मूळ माया असल्याने सकल विश्वाला गवसणी घालू शकते. कवींना आणि लेखकांना तीच स्ूर्ती देते आणि आपल्या कृपाप्रसादाने अजाेड अशी गद्य-पद्यरचना घडवून घेते. तिचा जन्म परमात्मस्वरूपातून हाेताे. म्हणून ती परमात्म्याची कन्या आहे; पण त्यानंतर ती परमात्म्यालाही साक्षीरूप बनवते. या नात्याने ती परमात्म्याची आई आहे असे शारदेचे गुणवर्णन करताना तिचा ‘मूळ पुरुषाची माउली । दुहितारूपे’ असा गाैरव करतात. यानंतर ते सद्गुरूला वंदन करतात. सद्गुरू म्हणजे सर्व विश्वावर आत्मज्ञानरूपी आनंदाचा वर्षाव करणारा मेघ आहे आणि त्या ज्ञानपावसाने शिष्यरूपी चातकांना नवसंजीवन प्राप्त हाेते असे म्हणतात
Powered By Sangraha 9.0