सत्संग याचा अर्थ काेणाला ऐकणं असा नव्हता, काेणाचं प्रवचन ऐकणं असा नव्हता.सत्संग याचा अर्थ सान्निध्य. अशा माणसाचं सान्निध्य की ज्यांच्याजवळ गेल्यास आपली अंतर्यात्रा साेपी हाेते, सुलभ हाेते.म्हणून आपल्याकडे दर्शनाची माेठीच किंमत हाेती. पाश्चात्यांना आश्चर्य वाटतं की दर्शनानं काय हाेणार? एखाद्याकडे गेलात, त्याच्या पाया पडलात-याच्यानं काय हाेणार? एखादं गहन वैज्ञानिक असं प्रयाेजन दर्शनाच्या मागे असतं, याचा पाश्चात्यांना ठाव नाहीये. आपण जर अशा एखाद्या पवित्र व्य्नतीजवळ जाऊन दाेन क्षणही थांबलात, दाेन क्षणही माथा झुकवला तरी परिणाम हाेईल. मस्तक नमवण्याचंसुद्धा विज्ञान आहेच.
आपलं डाेकं झुकताच, त्या पवित्र व्य्नतीचे तरंग आपणामध्ये सहज प्रवेश करू शकतात, आपण रिसेप्टिव्ह, ग्राहक हाेऊन जाता. काेणाच्या तरी पायी आपला माथा नमवायचं एकूण कारण इतकंच हाेतं की आपण त्याच्या तरंगांसाठी पूर्ण समर्पण करत आहात की त्याचे जे किरण आहेत, रेडिएशन्स आहेत त्यांनी प्रवेश करावा. असा एक क्षणभराचा स्पर्शही एक आंतरिक स्नान करवताे.अशा शुद्ध स्थानाबद्दल कृष्ण सांगत आहे.स्थान शुद्ध असावं, अशा वस्तू आसपास असाव्यात ज्या ध्यानात नेतात. अशा प्रकारच्या अनेक गाेष्टी धुंडाळल्या हाेत्या. ध्यानात उपयाेगी पडणारे सुगंध, ध्यानात उपयाेगी पडणाऱ्या वस्तू, प्रभावीत वस्तू, चार्जड ऑब्जे्नटस् हुडकल्या हाेत्या.आजसुद्धा अशा वस्तू वाचवण्याचा प्रयत्न चालताे; पण त्याबाबत ठाऊक नसतं. त्यामुळे अशा वस्तू वाचवणं अवघड हाेत चाललं आहे.