पत्र साेळावे
ज्याला विद्या नाही ताे एकदाच जन्मताे. ज्याचे विद्याध्ययन सुरू झाले ताे दुसऱ्यांदा जन्मताे व ‘द्विज’ या संज्ञेस पात्र हाेताे.परमार्थाच्या प्रांतात ‘द्विज’ हाेणे फार अवघड आहे.परमार्थाची इच्छा उत्पन्न झाली व आपण परमार्थ करू लागलाे म्हणजे आपला पहिला जन्म हाेताे, व जेव्हा आपला ‘मीपणा’ मरताे तेव्हा आपला दुसरा जन्म हाेताे व आपण परमार्थाच्या प्रांतात ‘द्विज’ या संज्ञेस पात्र हाेताे.गीतेमध्ये देवाला शरण जाण्यावर फार जाेर दिला आहे. तू असे लक्षात घे की, देवाला शरण म्हणजे मीपणाचं मरण.अहंकारनाशही गीतेचा पाया आहे. आरंभी अर्जुनाला अहंकार झाला हाेता. त्याचा अहंकार गेल्यावर त्याला गीतेचे तत्त्वज्ञान समजलं.शरीराला लठ्ठपणा आला की, शारीरिक विकृती सुरू हाेतात. डाॅ्नटर म्हणतात की - शरीराला लठ्ठपणा कमी करायला पाहिजे.अहंकार म्हणजे मनाचा लठ्ठपणा. मनाला लठ्ठपणा आला की, मानसिक विकृती सुरू हाेतात. हा लठ्ठपणा गेल्याशिवाय मानसिक आराेग्य प्राप्त हाेत नाही.
गीतेबद्दल तुला फार गाेडी वाटते. गीतेची शिकवणूक अंगी बाणण्याची तू खटपट करत आहेस.अहंकार नाहीसा करणं हा या बाबतीत महामंत्र आहे हे तू सदा लक्षात ठेव.अहंकार गेला म्हणजे आपण पराकाष्ठेचे नम्र हाेताे व आपणाला कळून येते - जाे नम्र झाला भूता । त्याने काेंडिले अनंता ।। तू आपल्या पत्रात धर्माबद्दल विचारले आहेस.जाे धर्म एकदा मनुष्य दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याचा ेष करण्यास शिकवताे ताे धर्मच नव्हे. गीता वाचून तुला कळून येईल की, शत्रूचादेखील द्वेष करावयाचा नाही.गीतेने अर्जुनास युद्ध करण्यास सांगितले याचे कारण न्याय प्रस्थापित करण्याकरता युद्ध करणे आवश्यक हाेते.युद्ध करणेचे पण ते कर्तव्यकर्म म्हणून शत्रूचा द्वेष न करता करणेचे अशी गीतेची शिकवणूक आहे.आपण शरीराच्या एखाद्या भागाचे ऑपरेशन करताे त्यावेळी त्या भागाचा द्वेष करत नाही, तर स्वास्थासाठी ताे भाग काढून टाकताे.
गीतेतले युद्ध म्हणजे खाटिकखाना नव्हे तर ऑपरेशन थिएटर आहे.गीता वाचून व मनन करून तुझी खात्री हाेईल की - गीताधर्म म्हणजे मानवता धर्म. माझी खात्री आहे की, भविष्य काळात साऱ्या पृथ्वीवर एकच राज्य हाेणार आहे, व त्या राज्यात जाे धर्म नांदणार आहे त्याचे नाव मानवताधर्म.हा भविष्यकाळ किती दूर आहे ते मात्र सांगणे कठीण आहे.एका पत्रात मी तुला मिथ्यावादाचा खुलासा केला हाेता. चातुर्मासात नियम करून तू सारी ज्ञानेश्वरी अर्थासह वाचलीस. तू मला विचारतेस - ‘‘ज्ञानेश्वरीत मायावाद आहे, की विवर्तवाद आहे, की अजातवाद आहे?’’ या प्रश्नाचे उत्तर देता येईल पण तू हे लक्षात घे की - हाच प्रश्न ज्ञानेश्वरीचे अभ्यासक गणपतराव कारखानीस यानी गुरुदेव रानडे यांना एकदा विचारला हाेता. गुरुदेव म्हणाले.‘‘गणपतराव, हा कडबा कशाला चघळता? ज्ञानेश्वरीत एकच आहे, आणि ते म्हणजे भ्नती.’’ ज्ञानेश्वरीत एक अत्यंत महत्त्वाची ओवी आहे ती तू लक्षात ठेव. ती ओवी अशी आहे -