ओशाे - गीता-दर्शन

13 May 2023 16:57:03
 
 

Osho 
 
ज्या वस्त्रात आपण संभाेग केला असेल त्या वस्त्रात ध्यान करणं तर महाकठिण हाेईल.ज्या अंथरूणावर पडून आपण कामवासनेचा विचार केला आहे, त्याच अंथरूणावर ध्यान करणं फारच अवघड हाेईल.कारण प्रत्येक वृत्ती, प्रत्येक वासना, आपल्या भाेवतीच्या वस्तूंना इनफे्नट करते, संसर्गाने दूषित करते.अशी माणसं या पृथ्वीवर आजही आहेत आणि प्रक्रियाही आहेत की त्यांना माझा रूमाल दिला तर माझ्याबाबत सर्व माहिती ती माणसं सांगतील. मी काेण - कुठला हा रूमाल कुणाचा वगैरे काही माहिती त्यांना दिली नाही, ते जाणवत नसेल तरी. कारण हा रूमाल माझ्याबराेबर राहिला आहे, त्यावेळी त्याने माझ्या सर्व संवेदना, माझे सर्व तरंग, माझे सर्व प्रकारचे प्रभाव ग्रहण केले आहेत. पिऊन टाकले आहेत. आत्मसात करून टाकले आहेत.
 
सुती कपडे चटकन् आत्मसात करतात.रेशमी कपडे ्नवचितच. रेशमी कपडे एकदम रेझिस्टंट आहेत. म्हणून ध्यानासाठी रेशमी कपड्यांचा वापर फार पूर्वीपासून केला गेला आहे. रेशीम एकदम विराेधक आहे. ते जवळजवळ काहीच ग्रहण करीत नाही. निदान ते दुसऱ्या वस्तूंचे प्रभाव पीत नाही, असं इंप्रेशन पडलंच तर ते विखरून जातं. पुसून जातं.सुती कापड एकदम पिऊन टाकतं. तेव्हा सुती कापडाची खुबीपण आहे, धाेकापण आहे.जर ध्यानाच्या वेळी सुती कपडे वापरले तर ते ध्यान पिऊन टाकतील. पण मग त्यांचं संरक्षण करावं लागेल, कारण ते कपडे इतर प्रभावांचंदेखील असंच ग्रहण करतील अन् चाेवीस तासांमधून ध्यानाचा क्षण तर एखाद-दुसराच, ताेही माेठ्या मुश्किलीनं यायचा, बाकीचे क्षण तर खूप असतील, ते सारे ते कपडे पीत राहतील.
Powered By Sangraha 9.0