गीतेच्या गाभाऱ्यात

13 May 2023 16:53:39
 
 
पत्र साेळावे
 

Bhagvatgita 
 
पुढे 1956 साली The conception of Spiritual Life in Mahatma Gandhi and Hindu Saintsहा रामभाऊंचा ग्रंथ प्रसिद्ध झाला.महात्मा गांधी गीतेला फार मान देत असत. ते म्हणत असत की, गीता म्हणजे पेचप्रसंग काेष आहे. एखादा शब्द नडल्यावर आपण काेष उघडून पाहताे त्याप्रमाणे माझ्या जीवनात जेव्हा पेचप्रसंग निर्माण झाले तेव्हा तेव्हा मी गीता पाहिली व गीतेनेच माझे पेचप्रसंग साेडवले.रामभाऊंनी वरील ग्रंथात महात्मा गांधींच्या पारमार्थिक जीवनावर प्रकाश टाकला आहे.रामभाऊंनी गीतेवर पुस्तक लिहिले पण ते पुस्तक रामभाऊ 1957 साली वैकुंठवासी झाल्यानंतर प्रसिद्ध झाले. रामभाऊंच्या मते गीता म्हणजे साक्षात्काराचे तत्त्वज्ञान. कुणाला गीतेत ज्ञान महत्त्वाचे वाटते, कुणाला कर्म महत्त्वाचे वाटते, तर कुणाला भ्नती महत्त्वाची वाटते. रामभाऊंना गीतेचे रहस्य म्हणजे साक्षात्कार असे वाटते. गीतेचे तात्पर्य काढताना रामभाऊंनी साक्षात्कारावर जाेर दिला.
 
रामभाऊंनी परमार्थाच्या प्रांतात नामाला फार महत्त्व दिले.नाम हा त्यांच्या पारमार्थिक तत्त्वज्ञानाचा मध्यबिंदू आहे.ज्ञानेश्वर म्हणतातसार सार विठाेबा नाम तुझे सार। कबीर म्हणतात- नाम ते तेल असून त्यात मनाची वात भिजवली असता देवाच्या रूपाची ज्याेत पेटेल.तुलसीदास म्हणतात- नाम हे सगुण व निर्गुण या दाेहाेंचे साक्षी व प्रबाेधक असून त्यात उभयतांची भाषा समजावून देणारे चतुर दुभाषी आहे.खराेखर नामामध्ये फार माेठे सामर्थ्य आहे. गीता वाचून कृष्णाबद्दल तुला फार प्रेम वाटू लागले आहे. तू कृष्णनाम घेतेस.तुला अनुभव येईल कीआरंभी आपण जिभेने नाम घेताे.पुढच्या अवस्थेत गेल्यावर जीभ न वापरता आपण आतून नाम घेताे.त्याच्याही पुढच्या अवस्थेत गेल्यावर आपणाला अनुभव येताे कीआपण गप्प बसलाे असतानादेखील आतूनच नाम सुरू असते.
आपण म्हणताेदेव करताे आमचा जप.
 
आम्ही बसताे गप.अशी अवस्था प्राप्त झाल्यावर आपणाला खूप आनंद हाेताे व मग आपल्या अंत:करणातला देव आपणाशी बाेलू लागताे.हाच ताे कृष्ण.गीतेत कृष्णाने म्हटले आहे की- मी सर्वांच्या हृदयात आहे.तू असे लक्षात घे की, आपल्या हृदयात जाे देव आहे त्याला जाणून घेणे हाच खरा परमार्थ.आपण कृष्णाचे नाम घेताे- रामाचे, कृष्णाचे, गणपतीचे का शिवाचे याला विशेष महत्त्व नाही.
काेणत्याही देवाचे नाव घेतले तरी देव आपल्या अंत:करणात आहे ही गाेष्ट लक्षात ठेवली पाहिजे. या अंत:करणातील देवाला जाणणे, त्याचे बाेल ऐकणे व त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणे म्हणजे जीवनाचे सार्थक करणे.आपल्या अंतरंगातील देवाचा बाेध झाला म्हणजे आपण आपल्यामध्येच संतुष्ट हाेताे व आपणाला आत्मानंद प्राप्त हाेताे.उपनिषदानी आत्मरती, आत्मक्रीड, आत्ममिथुन, आत्मानंद असे शब्द वापरले आहेत तर गीता म्हणते-
Powered By Sangraha 9.0