पैशाविषयी काही लाेकांच्या मनात भ्रम आहे.काहीजण पैशालाच सर्वस्व मानतात. त्यांच्यासाठी पैसा म्हणजेच देव हाेय.पैशासमाेर सर्व नातीगाेती त्यांना गाैण वाटतात. काही लाेकांना मात्र पैसा म्हणजे मातीमाेल वाटताे. ते वाट्टेल तसा पैसा उधळतात. आपल्याला हे माहीत असायला हवे की, पैसा पैसा आहे, मालक नव्हे. पैसा काहीतरी असू शकताे, खूप काही असू शकताे; पण सर्वस्व असू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी पैशाला सर्वस्व मानले, ते आयुष्याच्या शेवटी रडले आहेत.