याही ओवीत ज्ञानेश्वर असुरी प्रवृत्तीच्या लाेकांच्या लीला वर्णन करीत आहेत. आज मी हे मिळविले, उद्या त्याचे द्रव्य मिळवीन, एवढीच त्यांची इच्छा असते. आणि या भांडवलावर या जगात मी ायदा प्राप्त करून घेईन असे ते मानतात.सर्व जगाच्या संपत्तीचा मी एकटाच धनी हाेईन, तिचा वाटा काेणालाही देणार नाही, असे ते मानतात. आजपर्यंत अनेक शत्रू मारले. आता आणखीही माेठे शत्रू मारून मी एकटाच आनंदाने नांदेन. सर्वजण माझे दास हाेतील.दास हाेणार नाहीत त्यांना मी मारून टाकीन. इतकेच नव्हे तर या चराचरातील ईश्वर मीच आहे असे ते मानतात.भाेगांचा राजा मीच आहे. माझ्याशी तुलना करताना इंद्रदेखील तुच्छ आहे असे त्यांना वाटते. मनाने, वाचेने,देहाने मी करीन ते हाेईल. माझ्याशिवाय दुसरा माेठा काेण आहे? मी एक सुखाची रासच आहे असे मी मानताे.
आसुरी प्रवृत्तीचा मनुष्य असे म्हणताे की, कुबेराचे ऐश्वर्य माझ्यापेक्षा कमी आहे. संपत्तीच्या बाबतीत लक्ष्मीपती भगवानदेखील माझ्याशी बराेबरी करणार नाहीत. माझ्या कुळाची शुद्धता, जातीची महत्ता ब्रह्मदेवांपेक्षा माेठी आहे, असे ताे मानताे.म्हणून ईश्वर व त्याचे अवतार हे सर्व व्यर्थ असून माझ्याशिवाय इतर काेणीही नाही, असे ताे म्हणताे. जारणमारणाचा ताे उद्धार करताे. दुसऱ्यांना त्रास देणारे यज्ञ ताे करीत असताे.माझी स्तुती जे करतील, माझी करमणूक जे करतील, त्यांना मी हवी ती वस्तू देईन, असे ताे मानताे. मादक पदार्थांच्या खाण्यापिण्याने व तरुण स्त्रियांच्या आलिंगनाने मी त्रिभुवनात सुखाची मूर्ती हाेईन, असे ताे म्हणताे. ार काय सांगू ? हे आसुरी प्रवृत्तीचे लाेक आकाशाच्या ुलांचा वास नेहमी घेत असतात.