ओशाे - गीता-दर्शन

08 Apr 2023 14:49:57
 
 

Osho 
 
हे सगळे फरक का पडतील? आपल्यामुळे! आपल्याला इत्नया छाेट्या गाेष्टी बदलवतात की ज्याचा हिशेब नाही.म्हणून तर कबीरसारखे लाेक जे म्हणतात ते आपल्यासाठी धाेकादायक असल्याचं सिद्धही हाेतं. आपण म्हणताे काय आसनाचं एवढं, असं जे कबीर म्हणतात ते एकदम बराेबर आहे. गाेष्ट बराेबर तर आहे पण आपण जिथं आहाेत त्याचा विचार केला तर ते एकदम चुकीचं आहे.अन् या जगात सारी व्नतव्य सापेक्ष असतात आणि ज्या कुणाला अ‍ॅबसाेल्यूट, निरपेक्ष व्नतव्यं द्यायची सवय असते त्यांचा आपल्याला काहीएक उपयाेग नसताे. जसे कृष्णमूर्ती, त्यांची सारी व्नतव्यं निरपेक्ष आहेत, त्यामुळे ती एकदम निरूपयाेगी आहेत. खरी असूनही व्यर्थ आहेत.एखाद्यानं त्यांची प्रवचनं वर्षानुवर्षे ऐकली तरी ताे जिथे पूर्वी उभा हाेता त्याच ठिकाणी उभा असेल. त्याची एक इंचभरही प्रगती हाेणार नाही.
 
कारण ज्या गाेष्टींद्वारे आपण यात्रा करू शकताे त्या सगळ्यांचा त्यात निषेध आहे आणि त्यांचं सांगणं एकदम बराेबर आहे. लक्षात तर येईल मात्र अनुभवास बिलकुल येणार नाही. आणि समज व अनुभव यामध्ये इतकी माेठी दरी आहे की ती कधीच भरून येण्याची श्नयता नाही.कृष्णमूर्तींची प्रवचनं ऐकणारे, चाळीस वर्षांपासून त्यांची प्रवचने ऐकणारेही माझ्याकडे येतात.ते म्हणतात आम्ही गेली चाळीस वर्षे ऐकत आहाेत. ते काय म्हणतात ते आम्हाला चांगलं समजतं. एकदम व्यवस्थित समजतं. बाैद्धिक समज आम्हाला पुरेपूर आहे. पण आंतरिक फरक का हाेत नाही, ते काही समजत नाही.जर का त्यांना असं म्हटलं की आसन असं घ्यायचं तर लगेच ते म्हणतील आसनाचा अन् आत्म्याचा काय संबंध?
Powered By Sangraha 9.0