गीतेच्या गाभाऱ्यात

08 Apr 2023 15:04:52
 
 
पत्र अकरावे
 

Bhagvatgita 
‘कृण्वंताे विश्वमार्यम्’ ही पूर्वीची जिद्द विसरली गेली व इतरांना आपल्या धर्मात घेण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपले लाेक इतर धर्मांत जाऊ दिलेकाश्मीरचे मुसलमान पूर्वीच्या काळी म्हणत हाेते की आम्हाला हिंदू करून घ्या.काशीच्या पंडितांचा सल्ला घेण्यात आला. पंडित म्हणाले- ‘‘या जन्मात नाही. पुढल्या जन्मी’’ असल्या काेतेपणामुळेच आपल्या धर्मांची पीछेहाट झाली.शिवाजीच्या वेळी एका ब्राह्मणास मुसलमानांनी स्नतीने मांस खावयास घालून बाटवले. पैठणचे पीठाधिपति त्या ब्राह्मणास हिंदु धर्मांत परत घेण्यास तयार हाेईनात. त्यावेळी शिवाजी महाराजांनी तंबी दिल्यावर त्या ब्राह्मणास परत हिंदु धर्मांत घेण्यात आले.शिवाजी महाराजांची विशालता आपल्या लाेकात असती तर आपल्या धर्माची पीछेहाट झाली नसती.
 
तू आपल्या पत्रात गाेपींच्याबद्दल विचारले आहेस. तू असे लक्षात घे कीगाेपींचे प्रेम हे शारीरिक प्रेम नसून भ्नितप्रेम हाेते. गाेपी म्हणजे भ्नितप्रेमाच्या मूर्तिमंत देवता.म्हणूनच कबीर म्हणतात.कबीर कबीर ्नया कहे कबीर। एक गाेपीके प्रेम में बह गये काेटी कबीर। महाभारतातील एक सुंदर गाेष्ट तुला सांगताे. अर्जुनाने सुभद्रेशी लग्न केले व ताे परत आला. परत आल्यानंतर ताे एकटाच द्राैपदीला भेटण्यास गेला. बाकीच्या पांडवांनी दुसरी लग्ने केली हाेती.अर्जुनाने सुद्धा दुसरे लग्न केले हाेते, पण त्यावेळी द्राैपदीला राग आला नाही. तिच्या मानाने बाकीच्या स्त्रिया सामान्यहाेत्या. पण अर्जुनाने सुभद्रेशी लग्न केल्यावर द्राैपदीला राग आला. तिचा सवतीमत्सर जागा झाला.
 
अर्जुन भेटावयास आल्यावर द्राैपदी फणकाऱ्याने म्हणाली- ‘‘आता कशाला माझ्याकडे आलात. तुमची पट्टराणी आहे ना? तिच्याकडे जा.’’ द्राैपदीचा पारा चढलेला पाहून अर्जुन तेथून निघाला व ताे सुभद्रेकडे आला व तिला म्हणाला- ‘‘गाेपीचा वेश धारण कर व द्राैपदीच्या पाया पड.’’ सुभद्रेने गाेपीचा वेष धारण केला. ती एकटी द्राैपदीकडे गेली व तिच्या पाया पडली.गाेपीच्या वेषातली सुभद्रा पाहून द्राैपदीचा राग पार निघून गेला. तिने सुभद्रेला मिठी मारली व म्हटले- ‘‘तू किती प्रेमळ आहेस!’’ शेवटी तू आपल्या पत्रांत लिहितेस ‘‘आमच्या मंडळात भ्नितपर अभंगांच्या स्पर्धा आहेत. मी त्यात भाग घेणार आहे.
 
अट अशी आहे की जे अभंग म्हणावयाचे ते अगदी नवीन पाहिजेत. आमचे मास्तर मला अभंग शिकविण्यास तयार आहेत. पण त्यांना अभंग करता येत नाहीत. तरी तुम्ही स्वत: माझ्यासाठी दाेन भ्नितपर अभंग तयार करा.एक माेठा अभंग असू द्या व दुसरा छाेटा असू द्या. हे काम जरूर कराच. नाही म्हणू नका. आपले लग्न झाल्यावर मला तुम्ही नवीन नवीन उखाणे करून देत हाेता; आता नवीन अभंग जरूर करा.’’ ठीक आहे. दाेन अभंग असे आहेत - पहिला आहे माेठा व दुसरा आहे छाेटा.करा देवभ्नित हाेते चित्तशुद्धी। तेणे सुखसिद्धि लाभतसे।।1।। असाे नारी नर भ्नतीने उद्धार। उपदेश थाेर हाचि असे।।2।। माझ्या हृदयात सापडले धन।
Powered By Sangraha 9.0