मागच्या ओवीत अज्ञानी म ाणसाचा देवधर्म कसा व्यर्थ असताे, हे ज्ञानेश्वरांनी सांगितले. येथे त्याचे ज्ञान किती भ्रामक असते, याचे वर्णन आले आहे. एकांत, तपाेवने, पवित्र नद्या यांचाही त्याला कंटाळा येताे.लाेकांच्या गर्दीचे त्याला काैतुक वाटते. आत्म्याचा साक्षात्कार हाेईल, अशा ब्रह्मविद्येची ताे निंदा करताे. ताे उपनिषदे पाहत नाही. त्याला याेगशास्त्र आवडत नाही. खरे पाहता ताे सर्व कर्मकांड जाणताे. पुराणे त्यांची ताेंडपाठ असतात. ज्याेतिषशास्त्रात ताे निष्णात असताे.त्याचे काम कलाकाैशल्यपूर्ण असते. पाकक्रियेत त्याला रस असताे. मंत्रशास्त्र, जारणमारण, उच्चाटण इत्यादी विधी ताे जाणताे. कामशास्त्र त्याला पूर्णपणे अवगत असते. त्याला महाभारत माहीत असते.मूर्तिमंत मंत्रशास्त्र त्याच्या स्वाधीन झालेले असते. त्यालानीतिशास्त्र अवगत असते. ताे वैद्यक जाणताे. काव्य व नाटक यात ताे लक्ष घालताे.
स्मृतींतील विचार त्याला माहीत असतात. जादूविद्येचे मर्म ताे जाणताे. शब्दकाेशाचा त्याला परिचय असताे.व्याकरणशास्त्रात ताे तत्पर असताे. त्याला तर्कशास्त्र समजते; पण इतके समजूनही त्याला खऱ्या आत्मज्ञानाबद्दल काहीही गंध नसताे.ज्ञानेश्वरांनी त्याला जन्मांध म्हटले आहे. एका अध्यात्मज्ञानाखेरीज इतर सर्व शास्त्रे गाैण आहेत. मूळ नक्षत्रावर जन्मलेर्ल्यां मुलास जसे आईबापांनी पाहू नये, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाने इतर शास्त्रांना महत्त्व देऊ नये. सर्व ज्ञानांत अध्यात्मज्ञान श्रेष्ठ का व कसे हे सांगताना ज्ञानेश्वर एक समर्पक व उत्तम दृष्टांत देतात. माेराच्या अंगावर अत्यंत देखण्या डाेळ्यांची पिसे असतात; पण या डाेळ्यांचा त्याला पाहण्यासाठी काही उपयाेग हाेत नाही. त्याप्रमाणे एका आत्मज्ञानावाचून इतर सर्व ज्ञान व्यर्थ आहे.