गीतेच्या गाभाऱ्यात

07 Apr 2023 17:51:36


पत्र अकरावे

Bhagvatgita
मामासाहेबांनी त्या संन्याशाला पाच रुपये देऊ केले.संन्सासी म्हणाले- ‘‘पैशाला शिवायचे नाही असा नियम आहे. तुम्ही माझ्याबराेबर स्टेशनवर चला व नाशकाचे तिकिट काढून द्या.’’ मामासाहेब मनात म्हणाले- ‘‘यांना गीता बराेबर समजली नाही.’’ मामासाहेब उघडपणे त्या संन्याशाला म्हणाले - ‘‘हे पाहा ! मला काॅलेजमध्ये जाण्याची घाई आहे. तुम्ही आपले वस्त्र पुढे करा. त्यात मी पाच रुपये टाकताे. तुम्ही त्या पैशाला शिवू नका. ते पैसे वस्त्रात गुंडाळून स्टेशनात जा.स्टेशनमास्तरापुढे वस्त्र धरा व त्यातले जरूर तितके पैसे घेऊन तिकिट देण्यास स्टेशनमास्तरांना सांगा. तुमचे वस्त्र पैशांना शिवेलतुम्ही पैशाला शिवू नका.’’ मामासाहेबांचा हा सल्ला संन्याशाला मान्य झाला व त्याने त्याप्रमाणे केले.तू असे लक्षात घे की व्यवहार विचारात न घेता केलेले नियम शेवटी हास्यास्पद ठरतात.

पाश्चात्त्य लाेक गीतेवर इतके माेहून गेले आहेत ह्याचे कारण गीतेने व्यवहार व परमार्थ ह्यांची सांगड घातली आहे.जीवनाबद्दल तू विचारले आहेस. तू असे लक्षात घे कीजीवन हा एक खेळ आहे.तू ब्रिज खेळतेस. ब्रिजमध्ये कधीं चांगली पाने आपल्या वाट्याला येतात तर कधी वाईट पाने येतात. पाने कशीही आली तरी खेळात जाे काैशल्य दाखविताे त्याचेच काैतुक हाेते.सुख येवाे, दु:ख येवाे; जीवनाच्या खेळात जाे काैशल्य दाखविताे ताेच याेगी.गीतेत म्हटले आहे-याेग: कर्मसु काैशलम्। याेग म्हणजे कर्मामधील काैशल्य.
खेळ खेळतांना पाने वाईट आली किंवा चांगली आली तरी मनाचे समत्व जाे टिकवताे ताेच चांगला खेळ खेळू शकताे. ज्याच्या मनाचा ताेल गेला, त्याला चांगले खेळता येत नाही.जीवनांत दु:ख येवाे सुख येवाे जाे मनाचे समत्व टिकवताे ताेच याेगी.गीतेत म्हटले आहे.समत्वं याेग उच्चते। समत्वाला याेग म्हणतात.
 
खूप अनुभव घेऊन मला वाटू लागले आहे कीजीवनाची साधना म्हणजे काैशल्याची व समत्वाची साधना.तुझा पुढचा प्रश्न माेठा मजेशीर आहे. त्याचे उत्तर असे कीपरमार्थमार्गात प्रथम आपली स्थिती उपवर मुलीच्या वडिलांसारखी असते. बराच प्रवास केल्यानंतर व अनुभवाचे प्नवान्न चाखल्यावर आपली स्थिती संपन्न, सुंदर, सुशिक्षित अशा लग्नाच्या मुलाच्या वडिलांसारखी हाेते. अशा वेळी आपण हुंड्यासाठी काेणाची अडवणूक करू नये.तू हल्ली खूप वाचते आहेस. एक गाेष्ट मात्र लक्षात ठेव कीजेव्हा अंत:करणाचा प्रकाश डाे्नयात पडताे तेव्हा मांगल्याचे चांदणे जीवनात पडते, तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘हिदुधर्माचा सर्वमान्य ग्रंथ म्हणजे गीता. आपला धर्म सर्वांत जुना व सर्वांत चांगला असून त्याची पीछेहाट का?’’ हे पहा, आपल्या काही लाेकांनी अंत:करणाच्या साेवळ्यात किंमत देण्यापेक्षा बाह्य साेवळ्याला किंमत दिली.
 
Powered By Sangraha 9.0