पत्र अकरावे
(2) चाेरी करू नका.
(3) खाेटे बाेलू नका.
(4) मादक पदार्थाचे सेवन करू नका.
(5) काेणत्याही गाेष्टींचा लाेभ धरू नका.
निरनिराळे धर्म समजून घेतल्यावर तुझी खात्री हाेईल की, गीताधर्म सर्वांत चांगला आहे.मानवी जीवन म्हणजे साध्या अक्षरांचे काव्य नसून जाेडाक्षरांचे महाकाव्य आहे. या जीवनातात नाना तऱ्हेचे पेचप्रसंग निर्माण हाेतात. जाे धर्म मानवी जीवनातील काेणताही पेचप्रसंग साेडवू शकताे ताेच खरा धर्म.या दृष्टीने पाहता गीताधर्माला सर्वाेच्च मान द्यावा लागेल.मानवी जीवनातील पेचप्रसंग साेडवण्याचा उत्तम काेष म्हणजे गीताग्रंथ.गीता म्हणजे उपनिषदाचे सारसर्वस्व. ध्नकाधकीच्या जीवनकलहामध्ये ज्यायाेगे मन:शांती प्राप्त हाेते ताेच ग्रंथ उत्कृष्ट. शाेपेन हाॅवरने निरनिराळ्या धर्मातील मुख्य ग्रंथ वाचले हाेते. ताे म्हणताे- ‘‘मला जर मन:शांती कशानी मिळाली असेल तर ती उपनिषदांच्यामुळे-’’ मी खूपखूप वाचले आहे व त्यापेक्षा जास्त मनन केले आहे. माझा असा अनुभव आहे की मन:शांती मिळण्याकरता सर्वाेत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ. तुला देखील हाच अनुभव येईल.
पावसाळ्याचे दिवस आहेत, पहाट झाली आहे, आकाशात मळभ दाटून आले आहे, बाहेर पावसाची गाेड कुरकुर चालू आहे, थंडगार वारे अंगाशी झाेंबी खेळतात, अशा वेळी पांघरूण घेऊन झाेपण्यात जी मजा आहे त्यापेक्षा जीवनाच्या प्रवासात मन:शांती देणारा गीता ग्रंथ वाचण्यात जास्त मजा आहे.सारंगी कितीही गाेड वाजली तरी बुलबुलांच्या मधुर बाेलांची ती बराेबरी करू शकत नाही. शेकडाे दिवे उजळले तरी त्यांचा प्रकाश पाैर्णिमेच्या चांदण्याची बराेबरी करू शकत नाही. त्याप्रमाणे तू कितीही ग्रंथ वाचलेस तरी ते गीताग्रंथाची बराेबरी करू शकत नाहीत.तू गीताग्रंथ पुन:पुन्हा वाचत जा व त्याप्रमाणे वागत जा म्हणजे तुझे जीवन कृतार्थ हाेईल.
तू आपल्या पत्रात कर्म, ज्ञान व भ्नती याबद्दल विचारले आहेस. त्या बाबतीत मनन केल्यावर मला जाे विचार स्फुरला ताेअसासत्यभामेच्या अंगणात प्राज्नताचे झाड आणि रु्निमणीच्या अंगणात पडतात फुले. गाेड कर्माचा वृक्ष ज्ञानाच्या अंगणात पण फुले पडतात भ्नतीच्या प्रांगणात.
तू राेज नियमाने गीता वाच. गीता वाचण्याने माझे अष्टसात्त्विक भाव जागृत हाेतात. अंतर्मन बाेलू लागते.पाैर्णिमेच्या चंद्रातून सुखाचे बिंदु ठिपकावेत त्याप्रमाणे कृष्णाची प्रेमळ दृष्टी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते आणि मन हृदयाच्याचाैफळ्याकडे धाव घेते.त्या वेळी जीवनाला एक लय निर्माण हाेते व वाटू लागते की, ही लय कधीच लयाला जाऊ नये.तू व्यवहाराबद्दल विचारले आहेस. गीतेने व्यवहार व परमार्थ यांची सांगड घातली आहे. काही परमार्थी लाेक व्यवहार लक्षात न घेता काहीतरी नियम करतात व पुढे पुढे त्यांचे वागणे हास्यास्पद हाेते.तुला एक गाेष्ट सांगताे, एक संन्यासी मामासाहेब दांडेकरांच्याकडे गेले. मामासाहेब काॅलेजला निघाले हाेते.संन्सासी त्यांना म्हणाले- ‘‘मला नाशकाला जावयाचे आहे. मदत करा.’’ मामासाहेबांना तास घेण्यासाठी काॅलेजला जाणे जरूरीचे हाेते.