मांजर, शेखचिल्ली आणि त्यानंतर आता दिल्लीसुद्धा बेभरवशाची बनली आहे. हजची यात्रा करून परतलेल्या मांजरीने आता उंदीर खाणे साेडून दिले असून ती सुधारली आहे, असा विचार जर ‘उंदीरमामा’ करत असतील, तर ती त्यांची सर्वांत माेठी चूक ठरेल.जाे फक्त स्वप्नांतच जगू पाहताे त्या शेखचिल्लीवर विश्वास काय म्हणून ठेवावा? आणि ज्या ठिकाणी फक्त बाष्कळ बडबड करणाऱ्या व जनतेच्या कामांची टाळाटाळ करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांची भाऊगर्दी आहे, त्या दिल्लीकडून तरी काय अपेक्षा ठेवणार ?