गीतेच्या गाभाऱ्यात

05 Apr 2023 16:54:44
 
 
पत्र अकरावे
 
Bhagvatgita
ला इलिहा इल्ला अलाहां महंमद रसूल अलाहा (अलाहाशिवाय दुसरा परमेश्वर नाही व महंमद हा अलाहाचा प्रेषित आहे.) महंमदाची शिकवण साधी हाेती.परमेश्वर एक आहे व महंमद हा त्याचा प्रेषित आहे.मूर्तिपूजा करू नका.चाेरी करू नका.खाेटे बाेलूनका.काेणतीही नशा करू नका.खऱ्या अर्थाने मुस्लिम व्हायचे असेल, तर पाच नियमांचे पालन करावयास पाहिजे असे महंमद म्हणे.
 
(1) अल्लावर आणि त्याचा प्रेषित महंमद याचेवर विश्वास ठेवणे.
(2) राेज पाच वेळा प्रार्थना करणे.
(3) गरिबांवर दया करणे व त्यांना अन्न देणे.
(4) उपवासाच्या महिन्यात उपवास करणे.
(5) दरवर्षी म्नकेची यात्रा करणे.
 
ख्रिश्चन धर्माचा जसा बायबल हा धर्मगं्रथ आहे, त्याप्रमाणे मुस्लिम धर्माचा कुराण हा धर्मग्रंथ आहे.बाैद्ध धर्म भारतवर्षात सुमारे 2500 वर्षांपूर्वी गाैतम बुद्धाचा जन्म झाला. बाप राजा हाेता. घरी सर्व सुखे हाेती. गाैतमाच्या बायकाेचे नाव यशाेधरा. गाैतमाला एक मुलगा झाला हाेता.पण साऱ्यांचा त्याग करून सत्य शाेधण्याकरता गाैतम बुद्ध बाहेर पडला.औदुंबराच्या झाडाखाली ध्यान करीत असताना त्याला ज्ञानाची किल्ली सापडली. चांगल्याचा परिणाम चांगला हाेणार व वाईटाचा वाईट हाेणार ही ती किल्ली.गाैतम बुद्धाच्या मते मूर्तिपूजा निरर्थक आहे.बाैद्धधर्मामध्ये जीवनाचा अष्टांग मार्ग आहे ताे असा.
 
(1) सम्यक् दृष्टी - याेग्य विचार दृष्टी.
(2) सम्यक् संकल्प - काम, क्राेध, हिंसा इत्यादी दाेषांपासून अलिप्त असणे.
(3) सम्यक् वाणी - सत्य, मित व मधुर भाषण करणे.
(4) सम्यक् कर्म - चाेरी, व्यभिचार इत्यादी न करणे.
(5) सम्यक् आजीविका - शस्त्र, मांस, मद्य वगैरेचा व्यापार न करणे.
(6) सम्यक् व्यायाम - इंद्रियनियमन.
(7) सम्यक् स्मृती - नेहमी सावधानी वृत्ती.
(8) सम्यक् समाधी - एकाग्रता.
 
गाैतमबुद्धांनी मूर्तिपूजा करू नका म्हणून सांगितले पण आश्चर्याची गाेष्ट अशी की त्याच्या भ्नतांनी त्याच्या मूर्ती बनवल्या व त्या मूर्तीची ते पूजा करू लागले.जैन धर्म जैनधर्माचे संस्थापक महावीर यांचा जन्म मगध देशात एका राजघराण्यात झाला.वासनेमुळे मनुष्याला दु:ख हाेते. वासना साेडली म्हणजे मनुष्य सुखी हाेताे, हे जैनधर्माचे महान तत्त्व आहे. हा धर्म सांगताे की - (1) काेणत्याही प्राण्याला उच्चाराने, विचाराने वा आवाजाने दुखवू नका.
Powered By Sangraha 9.0