डॉक्टर , जिल्हाधिकारी ते‘अनअ‍ॅकॅडमी’चे संस्थापक

28 Apr 2023 14:58:49
 
 
 
 

IAS
 
राेमन सैनी यांचा 18 व्या वर्षांपासूनचा थ्नककरणारा जीवनप्रवास वयाच्या 18व्या वर्षी डॉक्टर , 22व्या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी आणि आज 26 हजार काेटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचे संस्थापक राेमन सैनी यांचा जीवनप्रवास असा वेगळा आहे.देशाच्या एड-टेक कंपन्यांमध्ये ‘अनअ‍ॅकॅडमी’(Unacademyहे नाव गेल्या पाच-सहा वर्षांत प्रसिद्ध झाले असून, अभियंत्यापासून उद्याेजकापर्यंतचा प्रवास केलेल्या गाैरव मुंजाल यांनी यूट्यूब चॅनेलपासून हे औद्याेगिक साम्राज्य उभे केले आहे.पण, त्यांच्या या प्रवासात आणखी एकाची साथ त्यांना मिळाली आणि त्यामुळे आज ‘अनअ‍ॅकॅडमी’ची उलाढाल 26 हजार काेटी रुपयांवर पाेहाेचली आहे. गाैरव मुंजाल यांना साथ देणारा तरुण साधा नसून, ताे आधी डॉक्टर हाेता आणि मग भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस)अधिकारी. या तरुणाचे नाव आहे राेमन सैनी.अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभलेल्या राेमन सैनी यांनी वयाच्या 18व्या वर्षीच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स) प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि ते डॉक्टर झाले.
 
नंतर त्यांनी केंद्रीय लाेकसेवा आयाेगाची (यूपीएससी) परीक्षा दिली आणि वयाच्या 22व्या वर्षी ते भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी झाले. मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मात्र, नाेकरीऐवजी व्यवसाय करण्याचे त्यांनी 2015मध्ये ठरविले आणि नाेकरीचा राजीनामा दिला. गाैरव मुंजाल आणि हिमेश सिंह यांच्याबराेबर राेमन सैनी यांनी ‘अनअ‍ॅकॅडमी’ची स्थापना केली. ‘हॅट टे्ननाॅलाॅजिज’ ((Hat Technologies) ही ‘अनअ‍ॅकॅडमी’ची पॅरंट ऑर्गनायझेशन असून, ती एड-टेक क्षेत्रात कार्यरत आहे. ‘अनअ‍ॅकॅडमी’ने यूट्यूबच्या माध्यमातून आयएएसची परीक्षा देऊ इच्छित असलेल्या हजाराे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.काेचिंग ्नलासवर लाखाे रुपये खर्च करण्याऐवजी या चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, असा त्यांचा हेतू आहे. या तिघांचे वेतनही प्रचंड आहे.‘अनअ‍ॅकॅडमी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गाैरव मुंजाल यांना 2022मध्ये 1.58 काेटी रुपये मिळाले.हिमेश सिंह यांना 1.19 काेटी रुपये आणि राेमन सैनी यांना 88 लाख रुपये देण्यात आले हाेते.
Powered By Sangraha 9.0