असं विद्युत ऊर्जेचं वर्तुळ बनणं ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. असं चक्र बनून इंद्रिये बाहेर राहून जातात, आपण आत राहता. आपण अन् इंद्रिये यांच्यामध्ये विद्युत ऊर्जेची एक जणू भिंत उभी राहते, ती ओलांडता येत नसते. या घडीला आंतरआकाशाची यात्रा करणं साेपं हाेऊन जातं.कृष्णमूर्ती कितीही सांगाेत, कबीर कितीही सांगाेत, त्यांचं बाेलणं जरा सावधपणे ऐका.त्यांचं म्हणणं धाे्नयात नेऊ शकतं. ते म्हणतील, आसनानं काय हाेणार? त्यानं काय हाेईल, मेथडाॅलाॅजीनं काय हाेईल? त्यांच्या पातळीवरून ते बाेलतात ते ठीक आहे.
त्यांचं आंतरआकाश, अन् त्याची आंतरविद्युत-ऊर्जा यांची यात्रा सुरू हाेऊन चुकलीय, याचा कदाचित त्यांना पत्ताही नसेल.कृष्णमूर्तींच्या बाबतीत तर ही गाेष्ट अगदी स्पष्ट आहे की त्यांच्यावर लहानपणी जे प्रयाेग केले गेले ते जवळ जवळ त्यांना बेशुद्ध करूनच केले गेले.त्यामुळे त्यांना या गाेष्टींचा मागमूसही कधी लागला नाही की आपल्यावर काय प्रयाेग केले गेले.चेतनारूपानं त्यांना काहीएक ठाऊक नाहीये की आपल्यावर काेणते प्रयाेग झाले. त्यामुळे आपण येथे कसे आलाेत, काेणत्या रस्त्याने आलाेत, याचा बिलकूल पत्ता नाही.