तर माया ही सगुण-साकार आणि मर्यादित आहे. ब्रह्म निर्मळ, निश्चल आणि निरूपाधिक तर माया चंचल, चपळ आणि उपाधीपूर्ण आहे. असे सांगून श्रीसमर्थ माया आणि ब्रह्म यातील प्रत्येक बाबतीतला भेद या समासात सांगतात. माया दिसते, भासते आणि नाशही पावते, तर ब्रह्म अदृश्य, अस्पर्श आणि अविनाशी असते. मायेला जन्म, मृत्यू आणि जाणीव असते, तर ब्रह्माला आदी, अंत नसताे आणि ते पंचेंद्रियांनी जाणता येत नाही. जे जे दिसते ते बदलते आणि अंती नाश पावते ते ते सर्व ही परमात्म्याची माया आहे. परब्रह्माची ही माया दृश्य सृष्टीरूपात आल्याने आपण ती पाहताे; परंतु तिच्यामुळे झाकून गेलेले जे मूळ परमात्म तत्त्व आहे ते मात्र विसरून जाताे. साधुसंत ते मूळ ब्रह्मस्वरूप जाणतात आणि आपल्याला ब्रह्म आणि माया वेगवेगळी करून सांगू शकतात. यासाठी त्यांची संगती धरून उपदेश घेतला म्हणजे आपणही खरे सत्य जाणू शकू.
ते जाणल्यामुळे आपले दृश्य जगामध्ये रममाण झालेले मन परमात्मबाेधाने शांत हाेईल आणि त्यामुळेच आपण ऐहिक सुखाचा मार्ग साेडून निरंतर माेक्षाला प्राप्त हाेऊ शकू, असा विश्वास देतानाच श्रीसमर्थ या समासाच्या उपसंहारात अतिशय मनाेज्ञ उदाहरण देतात. ते म्हणतात की, या सर्व मायेचा निर्माता; परंतु या उपाधीहून वेगळा असा परमात्मा आहे. जसे आकाशाचे पाण्यात प्रतिबिंब पडते; परंतु आकाश प्रत्यक्ष पाण्यात नसून स्वतंत्रच असते, तसे ही सृष्टी परमात्म्याचे प्रतिबिंबस्वरूप आहे आणि अविनाशी परमात्मा अनादी-अनंत आहे हे जाणून साधकांनी या दृश्यात गुंतून न जाता निर्गुण-निराकार परमात्म्याची मनाेभावे भक्ती करावी व जन्ममरणाच्या ेऱ्यातून सदैवची मुक्ती मिळवावी ! -प्रा.अरुण गाेडबाेले, माे. 9822016299