वाच्यार्थ : जे लाेक वेदांना, पांडित्याला, शास्त्रांना, सदाचाराला आणि शांत मनुष्याला बदनाम करतात, ते व्यर्थच कष्ट करीत असतात.
भावार्थ : वेद, पांडित्य, शास्त्र, सदाचार आणि शांत स्वभाव यांना चुकीचे सिद्ध करणाऱ्यांविषयी येथे सांगितले आहे.
1. वेद : वेद हे जीवनाचे सार आहे. वेद मनुष्याला त्याच्या कार्यकर्तृत्वाची शिकवण देतात. त्याने मनुष्य चांगल्या प्रकारे जीवन व्यतीत करताे.
2. पांडित्य : पांडित्य म्हणजेच ज्ञानावर प्रभुत्व. पांडित्यामुळे इतरांनाही त्या ज्ञानाचा लाभ हाेताे.
3. शास्त्र : शास्त्र मनुष्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगतात,