आज, भेसळीचा जमाना आहे. बाजारात हे भेसळ करण्याचे काम जाेरात सुरू आहे.एक जण आपल्या घरी कीटक मारण्याचे औषध घेऊन आला. दुसऱ्या दिवशी त्याने जेव्हा ते औषध जवळून पाहिले, तेव्हा त्या औषधालाच कीड लागली हाेती. आता यापेक्षा माेठा भ्रष्टाचार ताे आणखी काय असू शकताे? कीड मारण्याच्या औषधालाच जर कीड लागत असेल, तर पुढे बाेलायचं तरी काय? पूर्वी, लाेक दुधात पाणी मिसळायचे; आता मात्र पाण्यात दूध मिसळलं जातंय. प्रत्येक वस्तूत भेसळ आहे.