गीतेच्या गाभाऱ्यात

25 Apr 2023 15:31:43
 
 
पत्र चाैदावे
 
Bhagvatgita
तू असे लक्षात घे की.दैव आपल्या हातात नाही, प्रयत्न आपल्या हातात आहे.प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. पाऊस वेळेवर पडेल का हे आपल्या हातात नाही, पण जमिनीची मशागत करून बी पेरणे आपल्या हातात आहे. आपण मशागत केली नाही व बी पेरले नाही तर पाऊस वेळेवर पडूनही पीक येणार नाही. अशा परिस्थितीत अंत:करणातील ईश्वराला स्मरून आपण याेग्य दिशेने जास्तीत जास्त प्रयत्न करावा, व यश आले तर नाचू नये व अपयश आले तर खचू नये.तू लिहितेस - ‘‘मनात नाना तऱ्हेचे विचार येतात. येऊ नये तेसुद्धा विचार येतात. लाेक म्हणतात विचार दाबून ठेवावे. पण अनुभव असा येताे की विचार जितके दाबावे तितके ते उसळी मारून वर येतात. विचारचक्रांत अडकल्यामुळे शांती मिळत नाही.मी शांतीसाठी हपापलेली आहे. सगळेच लाेक शांतीसाठी हपापलेले असतात.
 
तरी अनुभवसिद्ध उपाय सांगा.’’ प्रश्न माेठा चांगला आहे. माणसाने ‘‘मी’’ चा शाेध करावा इंद्रियांचा प्रांत, मनाचा प्रांत, बुद्धीचा प्रांत व दिव्य श्नतीचा प्रांत असे चार प्रांत आहेत. इंद्रिये म्हणजे मी हा विचार जाेपर्यंत आहे ताेपर्यंत शांती मिळणार नाही. इंद्रियांच्या वरचा प्रांत म्हणजे मनाचा प्रांत मन म्हणजे मी असे वाटते ताेपर्यंत देखील शांती मिळत नाही.मनाच्या वरचा प्रांत म्हणजे बुद्धीचा प्रांत. बुद्धी म्हणजे मी अशी आपली समजूत असते ताेपर्यंत देखील खरी शांती प्राप्त हाेत नाही. बुद्धीच्या वरचा प्रांत म्हणजे दिव्यश्नतीचा प्रांत. दिव्यश्नती म्हणजे मी असा जेव्हा विचार प्नका हाेताेतेव्हा मात्र शांती लाभते. दिव्यश्नती म्हणजे मी असे आपणास वाटू लागल्यानंतर मनात जरी काही विचार आले तरी त्यांचा आपल्यावर पगडा बसत नाही. दिव्यश्नती म्हणजे मी अशी अवस्था झाल्यावर मनात येणारे विचार दाबून टाकण्याचे कारण नाही. आपण त्रयस्थपणाने त्या विचाराकडे पाहताे. ते विचार येतात व निघून जातात. आपण शांत असताे.तू लिहितेस - ‘‘काही तत्त्वज्ञानी म्हणतात की, दु:ख झाले असताना देखील दु:खी हाेऊ नये व सुख झाले असताना देखील सुखी हाेऊ नये.
 
स्वाभाविक आवेग मारणे म्हणजेच का तत्त्वज्ञान? असला विचार मला पटत नाही. आपलं मूल मेलं तर आपण रडणारच. लग्नानंतर बारा वर्षांनी एकाद्या बाईला मुलगा झाला तर तिला खूप आनंद हाेणारच. हा स्वाभाविकपणा नाही का? हा स्वाभाविकपणा मारून वर्तन करावे, असले तत्त्वज्ञान कसे पटणार?’’ पुष्कळ लाेकांना तुझ्यासारख्याच शंका आहेत. पहा, नाटकात नट सुख झाले असता सुखी हाेताे. दु:ख झाले असता दु:खी हाेताे. पण त्याला आतून माहिती असते की आपण वेगळे आहाे. आपण काेण हे त्याला माहीत असल्यामुळे नाटकातल्या सुखदु:खाचा त्याच्यावर परिणाम हाेत नाही.सुखाच्या वेळी ताे हसताे.दु:खाच्या वेळी ताे रडताे. पण मी काेण हे माहीत असल्यामुळे सुखदु:खाचा त्याच्यावर परिणाम हाेत नाही.तत्त्वज्ञानी मनुष्य जीवनाच्या रंगभूमीवर सुखाच्या वेळी हसताे, दु:खाच्या वेळी रडताे. ताे स्वाभाविकपणा मानत नाही, पण ‘‘मी काेण?’’ हे त्याला माहीत असल्यामुळे सुखदु:खाचा त्याच्यावर परिणाम हाेत नाही.
Powered By Sangraha 9.0