त्याला काही माहिती नव्हती-तिबेट- भारतात शाेधलेल्या याेगासनांची. त्याला जर ही माहिती असती तर त्याची समज खूपच सखाेल बनली असती.ताे अगदी अंधारात चाचपडत हाेता.पण तरी त्याने बराेबर जागी चाचपडले.शरीरातली अशी काही ठिकाणे त्याने शाेधून काढली की ती दाबल्याने विशिष्ट परिणाम हाेतात.उदाहरणार्थ जबड्यात, दातांच्या आसपास त्याने अशी जागा शाेधून काढली की जिथं माणसाची हिंसा संग्रहित असते. तुमचं लक्ष या गाेष्टीकडे कधी गेलंही नसेल.एखाद्या अतिहिंसक माणसाची चिकित्सा थिओडेर रेक अगदी आगळ्या प्रकारेच करी.
ताे त्याला झाेपवी अन् त्याच्या जबड्याच्या विशिष्ट ठिकाणांवर इत्नया जाेराने दाबे की ताे माणूस आरडा-ओरडा करी, मारपीट करू लागे. आणि नेहमीच असे हाेत असे की रेकचे राेगी रेकला झकासपैकी ठाेकून काढीत असत. पण लगेच, दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यात फरक पडू लागे.त्यांच्या हिंसेत एक प्रकारचा माैलिक फरकच पडत असे.रेकचं असं म्हणणं हाेतं, अन् ते रास्त आहे की हिंसेचं जे माैलिक केंद्र आहे ते दात हेच हाेय.सर्वच जनावरांबाबत अन् माणसाबाबतदेखील.कारण माणूस हे एक जनावरांच्या साखळीतील फ्नत पुढे आलेलं जनावर आहे एवढंच. त्यापेक्षा जास्त नाही.एकूण एक जनावरे दातांनीच हिंसा करतात.दात तरी नाहीतर नखं तरी.