ही विवशता आहे, ती टाळता येणार नाही, पण तिच्या पलिकडे जाण्याचा उपाय आहे.जाे काेणी टाळू पाहील, दुर्लक्ष करून बाजूला टाकू पाहील, त्याला अडचण येईल. तिच्या पार जाणेच उचित, कारण पार जाण्यानेच पात्रता निर्माण हाेते.तर कृष्ण म्हणताे की असं आसन निवडा, उंच नकाे, सखल नकाे, असं आसन तयार करा, असं बसा, आणि मग इंद्रियांचा संकाेच करा. अन् अशा स्थितीत इंद्रियसंकाेच साेपा आहे. बाह्य-विघ्ने आणि बाधा यांचं निवारण करण्याची व्यवस्था केल्यावर इंद्रिय संकाेच साेपा हाेऊन जाताे.आपण कधी या गाेष्टीचा विचार केला नसेल, पण याेगाने अशी काही आसने शाेधली आहेत की ती आपल्या इंद्रियांना अंतर्मुखी करण्यात माेठ्या विलक्षण प्रकारे सहयाेगी हाेतात. अशा मुद्रा शाेधल्यात की त्या आपल्या इंद्रियांना अंतर्मुखी करण्यात मदत करू शकतात.
बसण्याच्या अशा पद्धती शाेधल्या आहेत की त्या आपल्या शरीराच्या विशिष्ट केंद्रावर दाब आणतात आणि त्यामुळे विशिष्ट इंद्रिये शिथिल हाेऊन जातात.अमेरिकेत नुकताच एक माेठा विचारवंत व वैज्ञानिक हाेऊन गेला-थिओडाेर रेक.त्याने माणसाच्या शरीराबाबत जितकी माहिती संपादन केली तितकी फारच थाेड्या जणांनी केली असेल. ताे म्हणत असे की माणसाच्या शरीरात असे काही बिंदू आहेत की त्यावर दाब दिला तर माणसाच्या वृत्तीमध्ये माैलिक फरक पडताे. आणि रेक हा काही याेगी नव्हता. ताे एक मानसशास्त्रज्ञ हाेता. फ्राॅईडच्या शिष्यांपैकी एक, शिष्याेत्तमांपैकी एक हाेता. त्याने हजाराेंना मदत केली.