गीतेच्या गाभाऱ्यात

20 Apr 2023 14:33:59
 
 
पत्र तेरावे

Bhagvatgita 
नीतिला अनुसरून असणारा अर्थ अथवा नीतिला अनुसरून असणारे काम हे ग्राह्य आहे-त्याज्य नव्हे.गीतेत गाेपालकृष्ण म्हणतात, धर्माविरुद्धाे भूतेषु कामाेऽस्मि भरतर्षभ। धर्माच्या विरुद्ध नसणारा काम मी आहे, असे कृष्ण म्हणतात.या विवेचनावरून तुला कळून येईल की - धर्म, अर्थ, काम माेक्ष या चार पुरुषार्थांमध्ये जाे पहिला पुरुषार्थ ताे नीतिधर्म. माणसाने अर्थ व काम हे पुरुषार्थ जरूर मिळवावे.मात्र त्यांचा पाया नीतिधर्म असावा. नीतिधर्माच्या विरुद्ध जे काम आहे त्यामागे माणसाने कदापि लागू नये.तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘तुम्ही नेहमी असे म्हणता की, धर्माने माणसाला माणसाबद्दल प्रेम वाटते. ज्या धर्मात माणसाला माणसाबद्दल प्रेम वाटत नाही, ताे धर्मच नव्हे. आता विज्ञानयुग सुरू आहे.या विज्ञानयुगात धर्माची आवश्यकता आहे का?’’ असे पहा की या विज्ञानयुगात माणसाला माणसाबद्दल प्रेम वाटेनासे झाले म्हणजे विज्ञान माणसांचाच नाश करील.
 
धर्म माणसाने माणसावर प्रेम करण्यास शिकवताे. अशा विज्ञानयुगात नुसती आवश्यकता नव्हे तर विशेष आवश्यकता आहे.बर्ट्रांड रसेल म्हणताे, ‘‘""In the new world which is comming into existance the kindly feeling towards others which religion has advocated will be not only a moral duty but an indispensable condition of survival.'' रसेलला वाटते की धर्माने शिकवलेले मनुष्याचे मनुष्याबद्दल प्रेम हे नवीन जगात नुसते नैतिक कर्तव्य राहिले नसून मानवजात जगायची असेल, तर ते अपरिहार्य झाले आहे.तू लिहितेस, ‘‘तुम्ही गीतेला माता म्हणता. तुमच्यामुळे मीसुद्धा गीतेला माता म्हणते. हल्लीच्या काळी एक फॅशन निघाली आहे की, लग्नानंतर मुलीने सासूला आई म्हणावयाचे. या प्रकारात पुष्कळ वेळा ताेंडदेखलेपणा असताे. पण, मी जेव्हा गीतेला माता म्हणते तेव्हा माझ्या मनात गीतेबद्दल प्रेमाचा सागर उचंबळून येताे. मला गीतेबद्दल फार प्रेम वाटते.
 
पण, मला शंका अशी आहे की, गीतेबद्दल फार प्रेम असणारे काही परमार्थी लाेक टाेकाला जातात. असेच एक गृहस्थ परवा म्हणाले की, ‘‘माझी बायकाे वारली तरी मला काहीसुद्धा दु:ख झाले नाही.’’ हा प्रकार बराेबर आहे का? आपले अत्यंत प्रेमाचे माणूस वारल्यावर अजिबात दु:ख न हाेणे हा अतिरेक नाही का? या अतिरेकाला सद्गुण म्हणता येईल का?’’ गीतेला माता म्हणताना तुझ्या मनात प्रेमाचा सागर उचंबळून येताे ही फार आनंदाची गाेष्ट आहे.बायकाे मेल्यावर अथवा आपले अत्यंत प्रेमाचे माणूस वारल्यावर अजिबात दु:ख न हाेणे हा अतिरेक आहे. हा सद्गुण नव्हे, केव्हा केव्हा अतिरेक हाेताे. आपले अत्यंत प्रेमाचे माणूस वारल्यावर एखादा मनुष्य म्हणताे की, आपल्याला काहीसुद्धा दु:ख झाले नाही, तर दुसरा एखादा मनुष्य इतके दु:ख करताे की,
Powered By Sangraha 9.0