सध्या कलियुग असल्याचे मानले जाते. या कलियुगात जास्तीत जास्त लाेक स्वार्थापाेटी कांहीही करतील.म्हणजेच प्रसंगानुरूप नीतिनियमाचे उल्लंघनही करतील.असे काही संत महात्म्यांनी त्यांना आलेल्या अनुभवांच्या व दूरदृष्टीच्या आधारे भाकीत केले आहे. खरे म्हणजे संतांचे कलियुगाबद्दलचे भाकीत खरेही ठरत आहे.जनसामान्य तर साेडाच, पण ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते, असेही भरपूर लाेक स्वार्थापाेटी नकाे ते करत असल्याचे आपल्या लक्षात येत आहे.स्वार्थ हा एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील लाेकांकडेच असताे असे नाही.
ज्या आध्यात्मिक क्षेत्रातून लाेकांची मानसिकता मानवतेकडे वळविली जाते, त्या क्षेत्रातही कलीचा प्रभाव जाणवावा हे दुर्भाग्य आहे.
कलीला प्रभावहीन करण्याची ताकद या क्षेत्रात असतानाही स्वार्थापाेटी संतांचे साेंग घेतलेले लाेक या क्षेत्रात शिरून या क्षेत्राकडे पाहण्याचा लाेकांचा दृष्टिकाेन बदलवत आहेत.अशा पाेटासाठी साेंग घेतलेल्या ढाेंगी संताबद्दल स्पष्टपणे बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, पाेटासाठी संत । झाले कलींत बहुत।। जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448