ओशाे - गीता-दर्शन

19 Apr 2023 18:01:26
 
 

Osho 
जर वीज एका वर्तुळात फिरली तर आपणास कधी ध्नका लागणार नाही. आणि वर्तुळ बनवण्याचा एकच मार्ग आहे आणि ताे म्हणजे आपण विद्युतवाहक नसलेल्या, नाॅन कंड्नटर वस्तूवर बसलेले पाहिजेत.मृगाजिन, व्याघ्रजिन ही अशी ऊर्जेची अ-वाहकं आहेत. वीज त्याच्यातून जाऊ शकत नाही, ती विजेला परत पाठवतात. लाकूड अ-वाहक आहे, ते वीज परत पाठवते. खडावा अ-वाहक आहेत, त्या विजेला परत पाठवतात.म्हणून ध्यान करणाऱ्याला खडावा उपयाेगी असतात. जाे ध्यान करताे त्याने लाकडाच्या चाैरंगावर बसणे उपयाेगी असते. ताे ध्यान करीत आहे, त्याला मृगाजिनाचा उपयाेग आहे.कबीरांना, कृष्णमूर्तींना विचारीत बसाल तर ते व्यर्थ वाटेल. ते म्हणतील हे सगळं व्यर्थ आहे.
 
पण वैज्ञानिकाला विचाराल तर ताे म्हणेल, ‘हे सार्थ आहे’ आणि ते सार्थ आहेही.जेव्हा विद्युत शरीरात अंतर्वर्तुळ बनवते तेव्हा परमशांतीचा अनुभव येताे. एक क्षण असा येताे की जेव्हा सारं व्यर्थ हाेऊन जातं. पण ताे क्षण अजून आलेला नाही. ताे क्षण येईल ताेपर्यंत ते सारं फार उपयाेगी असेल. एक क्षण असा येताे की शारीरिक विजेचं एक अंतर्वर्तुळ निर्माण हाेतं.अन् जे लाेक परमशांतीला उपलब्ध हाेतात, त्यांच्या हृदयात असं अंतर्वर्तुळ निर्माण हाेतं.विद्युत अंतर्वर्तुळ तयार करून घेते. मग ते लाेक जमिनीवर बसले तरी त्यांना काही शाॅक बसणार नाही.पण ही घटना अजून आपल्याबाबत घडलेली नाही. आपल्या आत कुठलंही अंतर्वर्तुळ नाहीये, इनर सर्किट अद्यापि नाहीये, अजून तर आपणाला बाह्य वर्तुळावरच अवलंबून राहावं लागेल.
Powered By Sangraha 9.0