चाणक्यनीती

19 Apr 2023 18:05:29
 
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : अभ्यासाने विद्या प्राप्त हाेते, चांगल्या चारित्र्यामुळे घराण्याचे नाव उज्ज्वल हाेते, ‘सद्गुणांमुळे’ व्यक्तीची श्रेष्ठता समजते आणि डाेळ्यांद्वारे राग व्यक्त हाेताे.
 
भावार्थ : येथे चाणक्यांनी काेणत्या गाेष्टीमुळे काय हाेते याविषयी सांगितले आहे.
1. विद्या : सतत वाचन, पठण, मनन, चिंतन अशा प्रकारे अभ्यास केल्यास एकाच गाेष्टीचे नवनवे पैलू आपल्या लक्षात येतात.
आपल्याला जे येते ते इतरांना शिकविल्यानेही अभ्यास हाेताे.
Powered By Sangraha 9.0