रस्त्यानं आपण चाललात, हललात, आपण काहीही केलंत, तरी त्यासाठी शरीरातील या ऊर्जेचा भाग तेवढ्या प्रमाणात खर्च झाला.
पण ध्यानात तर सगळी हालचाल बंद हाेऊन जाते, वाणी शांत हाेते, विचार शून्य हाेतात. शरीर निष्कंप राहील, चित्त माैन राहील, इंद्रिये शिथिल हाेऊन निष्क्रिय हाेऊन राहतील. यामुळे, चाेवीस तास जी ऊर्जा बाहेर फेकली जात आहे, ती सर्व आत एकत्र हाेईल, साठेल, सर्व ऊर्जा काॅन्झर्व हाेईल, एकवटेल.जर आपण अशा ठिकाणी बसला असाल की, जेथे बसल्याने विद्युत ऊर्जा आपल्या शरीराच्या बाहेर जाईल, तर जिवंत वायरला शिवल्यावर जसा शाॅक लागताे, तसाच शाॅकचा अनुभव आहे.माझ्याकडे अशी शेकडाे माणसं आहेत, की ज्यांचा हा अनुभव आहे, की जर ते ध्यानासाठी चुकीच्या ठिकाणी बसले तर त्यांना असा शाॅक बसला, त्यांना ध्नका लागला.
लाकडी खडावा पायात घालून जर जिवंत वायरला स्पर्श केला तर मात्र असा शाॅक लागत नाही. का? तर शाॅक विजेमुळे बसत नाही, विजेच्या तारेला शिवल्याने शाॅक बसत नाही, तर शाॅक बसताे ताे तारेतून जी ऊर्जा आपल्या शरीरात येते, तिला जमीन झट्नयाने ओढून घेते म्हणून. जमीन ती विद्युतऊर्जा झट्नयाने खेचून घेते, त्या क्रियेमुळे शाॅक लागताे. पण आपल्या पायात जर लाकडी खडावा असतील तर, असा शाॅक बसत नाही.मग तुम्ही तारेला स्पर्श केलात, तरी शाॅक बसत नाही.कारण जमीन ती ऊर्जा झट्नयाने ओढू शकली नाही, आणि लाकडी खडावांनी विजेचं वर्तुळ बनवून तिला परत पाठवले. शाॅक बसताे ताे वर्तुळ तुटल्याने, सर्किट तुटल्याने.