गीतेच्या गाभाऱ्यात

15 Apr 2023 15:47:48
 
 
पत्र बारावे
 
Bhagvatgita
जाे खरा धार्मिक असताे ताे दुसऱ्या धर्माला नांवे ठेवत नाही. तुम्ही कृपा करून हिंदु धर्माला नांवे ठेवू नका.’’ हे उद्गार ऐकून ताे प्रीस्ट म्हणाला- ‘‘वाटेल तित्नया शिव्या देणार. तुमचा हिंदू धर्म लबाड लुच्च्या लाेकांचा धर्म आहे. हा धर्म अत्यंत वाईट आहे. या धर्माला कितीही शिव्या दिल्या तरी त्यात काहीही बिघडणार नाही.असे म्हणून ताे प्रीस्ट हिंदु धर्माला भरमसाट शिव्या देऊ लागला.त्या हिंदू संन्याशाने त्या गाेऱ्या प्रीस्टचे हात धरले व म्हटले- ‘‘आता एक तरी शिवी दे. तुला उचलून समुद्रात फेकून देताे.’’ त्या हिंदू संन्याशाने जेव्हा गाेऱ्या प्रीस्टला पकडले तेव्हा ताे गाेरा म्हणाला- ‘‘चुकलाे, माफ करा. पुन्हा कधी तुमच्या हिंदू धर्माला मी नावे ठेवणार नाही.’’ त्या हिंदू संन्याशाचे नाव स्वामी विवेकानंद.स्वामी विवेकानंदांचे हे कृत्य देखील शास्त्राला अनुसरून हाेते व त्यांच्या स्वभाव धर्माला अनुसरून हाेते.
 
एकनाथ महाराजांचे कृत्य देखील शास्त्राला अनुसरून हाेते व त्यांच्या स्वभावधर्माला अनुसरून हाेते.पांडवांच्यावर कमालीचा अन्याय झाला हाेता. अन्याय नाहीसा करण्याकरता शास्त्राने प्रत्यक्ष प्रतिकाराचा व आत्म्नलेशाचा असे दाेन मार्ग सांगितले आहेत.अर्जुनाला माेह झाला. ताे स्वभावधर्म विसरला व युद्ध करत नाही म्हणाला.वास्तविक पाहता युद्ध करणे हे शास्त्राला धरून हाेते व अर्जुनाच्या स्वभावधर्माला अनुसरून हाेते.भगवान कृष्ण म्हणतात- यदहंकारमाश्रित्य न याेत्स्त्य इति मन्यसे। मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियाेक्ष्यति।। स्वभावजेन काैंतेय निबद्ध: स्वेन कर्मणा। कर्तुं नेच्छासि यन्माेहात्करिष्यस्यवशाेऽपि तत्।। मी युद्ध करणार नाही असे तू अहंकाराने मानीत आहेस.तुझा निश्चय फुकट आहे. तुझा स्वभाव तुला युद्ध करणेस लावील. हे अर्जुना, स्वभावजन्य कमनि तू बांधला गेला आहेस. माेहाने जे तू करू इच्छित नाहीस तेच स्वभावाच्या आधीन हाेऊन तुला करावे लागेल.
 
असे आहे म्हणूनच भगवंतानी अर्जुनास उपदेश केला कीतस्मात् युध्यस्व भारत। म्हणून तू युद्ध कर.या विवेचनावरून तुला कळून येईल कीएखाद्याने आपणावर अन्याय केला तर प्रत्यक्ष प्रतिकार करणे याेग्य का आत्म्नलेशाचा मार्ग अनुसरणे याेग्य हे आपल्या स्वभाव धर्माला जे अनुसरून असेल ते पाहून ठरवावयाचे असते.अर्जुनाला सल्ला देणारा कृष्ण हाेता. ताेच कृष्ण आपल्या हृदयात आहे. (सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट:) ताे आपणाला निश्चित सल्ला देताे. त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागण्यातच आपले अंतिम कल्याण असते.
भाग्याची गाेष्ट आहे की, तू गीतेचे तत्त्वज्ञान समजून घेत आहेस व त्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करत आहेस. कृपा करून लक्षात ठेव की - अंत:करणातील परमेश्वराला स्मरून आचार करावा व आचार करून प्रचार करावा. विचार, आचार व प्रचार यातील एकता म्हणजेच समता.
Powered By Sangraha 9.0