तरुणसागरजी

14 Apr 2023 15:12:21
 
 

Tarunsagarji 
साधूने एका मनुष्याला किती वाजले म्हणून विचारले. त्या मनुष्याने क्षणाचाही विचार न करता साधूच्या डाेक्यात काठीचा एक फटका हाणला आणि एक वाजला म्हणून सांगितले.त्यावर साधू दु:खी न हाेता आनंदाने जाेरजाेरात नाचू लागला. हे पाहून ताे माणूस म्हणाला, बाबा! मी तुमच्या डाेक्यावर काठी मारली आणि तुम्ही नाचताय! तुम्हाला वेड तर लागलं नाही ना? साधू म्हणाला, किती वाजले, हा प्रश्न मी जर तुला एक तासापूर्वी विचारला असता, तर तू माझी जी अवस्था केली असतीस, त्यापासून बचावलाे म्हणून आनंदाने नाचताेय!
Powered By Sangraha 9.0