पत्र बारावे
सिद्धांती - अहाे, प्रलय कशाचा? जग हे सत्य असेल तर त्याचा प्रलय हाेईल. अहाे, जग हे अज्ञानामुळे भासते. हा मायावाद आहे. ब्रह्म हे जगाचे उपादानकारण आहे. ही गाेष्ट श्रुतीवरून सिद्ध हाेते. त्या बाबतीत तर्काला किंमत नाही. श्रुती हेच प्रमाण. यावरून ब्रह्म जगाचे उपादानकारण आहे, ही गाेष्ट सिद्ध हाेते.अशा तऱ्हेचा हा वाद आहे. त्या वादावरून तुला कळून येईल कीआपले म्हणणे प्रस्थापित करण्यासाठी शंकराचार्यांनी (1) मायावाद व (2) वेदप्रामाण्य या दाेन स्तंभांचा उपयाेग करून घेतला आहे.तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘मला एक जबरदस्त शंका आहे. एखाद्याने आपणावर अन्याय केल्यानंतर आपण काय करावे? काही तत्त्वज्ञानी म्हणतात की, अशा वेळी प्रतिकार न करता आपण आत्म्नलेशाचा मार्ग पत्करावा.
दुसरे तत्त्वज्ञानी म्हणतात की, एखाद्याने आपणावर अन्याय केल्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रतिकार करायला पाहिजे. हे तत्त्वज्ञानी म्हणतात की, आत्म्नलेशाचा मार्ग बराेबर नसून प्रतिकाराचाच मार्ग बराेबर आहे. पहिले तत्त्वज्ञानी म्हणतात की, प्रतिकाराचा मार्ग बराेबर नसून आत्म्नलेशाचाच मार्ग बराेबर आहे. हा वाद न मिटणारा आहे. तुम्ही न्यायाधीश आहा. सारासार विचार करून तुम्ही विस्तृतपणे याेग्य निकाल मला सांगा.’’ तुझा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तुला माहीत असेल कीकाही काही मासिके चांगले प्रश्न विचारणाऱ्यांना बक्षिसे देतात.तुझा हा प्रश्नदेखील बक्षीस देण्याच्या लायकीचा आहे.बायबलमध्ये म्हटले आहे की - एखाद्याने आपल्या गालात मारली तर आपण त्याच्यापुढे दुसरा गाल करावा.बायबलचा हा मार्ग प्रतिकाराचा नसून आत्म्नलेशाचा आहे.
पांडवांच्यावर काैरवांनी पराकाष्ठेचा अन्याय केला.अर्जुनाच्या शंकेला उत्तर देताना कृष्णाने म्हटले - तस्मात् युध्यस्व भारत! हा युद्ध करण्याचा उपदेश म्हणजे प्रतिकाराचा मार्ग आहे.स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की - ‘‘बायबल मानणारे इंग्लिश लाेक दुसऱ्याने अन्याय केला तर गीतेच्या उपदेशाप्रमाणे प्रतिकार करतात आणि गीता मानणारे आपण दुसऱ्याने अन्याय केला तर प्रतिकार न करता आत्म्नलेशाचा मार्ग अनुसरताे. म्हणून म्हणावेसे वाटते की बायबल पाळताे आपण आणि गीता पाळतात इंग्लिश लाेक!’’ महात्मा गांधीचे काही अनुयायी म्हणतात की - ‘‘दुसऱ्याने आपल्यावर अन्याय केला तर आपण प्रत्यक्ष प्रतिकार न करता आत्म्नलेशाचा मार्ग पत्करावा म्हणजे दुसऱ्याचे हृदयपरिवर्तन हाेईल.’’ लाेक पुढे असेही म्हणतात.‘‘तस्मात् युद्धस्व भारत! असे म्हणून गीतेने जाे प्रतिकाराचा मार्ग सांगितला आहे ताे बराेबर नाही.’’