स्वत:च्या वाट्याला दु:ख येऊ नये किंवा वाट्याला दु:ख आले असेल तर तत्काळ नष्ट व्हावे म्हणून माणूस प्रयत्नशील असताे.पण इतरांच्या वाट्याला आलेले दु:ख नष्ट व्हावे म्हणून माणूस फारसा पुढाकार घेत नाही. एखाद्याने पुढाकार घ्यायचाच ठरवला तर अशी व्यक्ती बहुतांश वेळा प्रसिध्दीसाठी, स्वार्थासाठी पुढाकार घेत असल्याचे आपल्या लक्षात येते.निर्वस्त्रांना वस्त्र देणे, भुकेल्यांना अन्न देणे, रुग्णांना फळे वाटणे असे कार्यक्रम अधून मधून हाेत असल्याचे आपण पाहताे.चार आण्याची मदत आणि आठ आण्यांची प्रसिध्दी ही ठरलेलीच असते.
दुसऱ्याच्या दु:खावर पांघरूण घालण्याच्या नांवाखाली स्वत:च्या प्रसिध्दीची, माेठेपणाची पाेळी भाजून घेणारे भरपूर स्वयंघाेषित दानशूर समाजात आहेत.मानसिकदृष्ट्या दरिद्री असणारे हे लाेक खऱ्या अर्थाने दुसऱ्याच्या दु:खात सहभागी हाेऊन त्यांना दु:खातून बाहेर काढूच शकत नाहीत. समाजात स्वार्थापाेटी दुसऱ्यांना दु:खात मदत करणारे जसे लाेक आहेत, तसेच कसल्याही प्रकारचा स्वार्थ न जाेपासता नि:स्वार्थपणे मदतकरणारेही लाेक समाजात आहेत. जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448