ओशाे - गीता-दर्शन

12 Apr 2023 16:12:32
 
 

Osho 
जमिनीचं आकर्षण शरीरावर जास्तीतजास्त राहील, अशा अवस्थेत आपण शरीर ठेवू शकताे.आणि जिथे शरीरावर गुरुत्वाकर्षण असं जास्तीत जास्त असतं तिथे शरीर लवकर थकते. बेचैन हाेतं, संत्रस्त हाेतं आणि अशा अवस्थेत तुम्हाला चित्त स्थिर करणं जास्त अवघड जातं, कृष्णाला नव्हे....आपण शरीर अशा प्रकारे ठेवू शकताे की त्यावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमीतकमी, किमान असेल. आपण ज्याला सिद्धासन, सुखासन, पद्मासन म्हणताे ते कमीत कमी गुरुत्वाकर्षण असणारं आसन आहे.आज तर वैज्ञानिकसुद्धा या गाेष्टीचा स्वीकार करताे की जर माणूस बरेच दिवस, बराच काळ सिद्धासनात बसेल तर त्याचं आयुष्य वाढेल.आयुष्य वाढेल ते फ्नत एका गाेष्टीमुळे आणि ती ही की, त्याचं शरीर आणि जमीन यांच्यात असलेल्या आकर्षणात जाे संघर्ष आहे ताे किमान हाेईल अन् त्यामुळे शरीर कमीतकमी जीर्ण हाेईल.
 
तेव्हा जर कृष्ण असं म्हणताे की, फार उंच नाही फार खाेल नाही, अशी भूमी ध्यानासाठी निवडावी. तर त्याचीही कारणं आहेत. काेणी खड्ड्यांतही बसू शकताे. काेणी मचाण बांधून त्यावरही बसू शकताे. त्यात काय धाेका आहे? जर आपण खड्ड्यात बसलात, जमिनीच्या पातळीखाली बसलात तर दुसऱ्या नियमाकडे लक्ष द्यायला पाहिजे.मी येथे बाेलताेय... हा माईक मी खाली करीन, हाताच्या पातळीवर आणीन तर माझा आवाज माईकवरून वरच्यावरच निघून जाईल.माझ्या ध्वनिलहरी त्याच्यावरून निघून जातील.हा माईक माझा आवाज नीट पकडू शकणार नाही. हा माईक मी थाेडा वर केला तर माझ्या ध्वनिलहरी त्याच्याखालून निघून जातील.हा माईक त्यांना पकडू शकणार नाही.
Powered By Sangraha 9.0