या तेराव्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञेय, अज्ञान, प्रकृती इत्यादीचे विस्ताराने वर्णन केले. शेवटी ब्रह्माचे वर्णन करताना ते म्हणतात की, ब्रह्म आकाशाहूनही माेठे आहे. या ब्रह्माच्या ठिकाणी साम्यासाम्य असा भेद उरत नाही. त्याला आकार नसताे. त्याच्या ठिकाणी जीवदशा विरघळून जाते. तेथे द्वैत उरत नाही. ते एकाकी आहे. श्रीकृष्णांनी सांगितलेले हे सर्व ज्ञान ऐकून संजय धृतराष्ट्राला म्हणाला, महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जाे जीव अर्जुन त्याला हे सर्व ज्ञान सांगितले.का घागरीतील पाणी ज्याप्रमाणे दुसऱ्या घागरीत ओतावे, त्याप्रमाणे कृष्णांनी आपल्या अंत:करणातील बाेध अर्जुनाला दिला. अर्जुन हा तर नराचा अवतार आणि कृष्ण हे नारायणाचे अवतार असल्यामुळे ते दाेघेही ईश्वराचेचअंश आहेत. हा अर्जुन म्हणजे आपणच आहाेत, असे स्वत: कृष्णही म्हणतात. या कृष्णांनी अर्जुनाला सर्वस्व दिले, तरी अर्जुनाच्या मनाची तृप्ती झाली नाही.
अधिक सांगा, अधिक सांगा असे ताे म्हणू लागला. जळत असलेल्या दिव्याला तेल घातल्यावर ताे जसा माेठा हाेताे, त्याप्रमाणे अर्जुनाची इच्छा अधिक वाढली हे सांगून ज्ञानेश्वरांनी व्यवहारातील एक मार्मिक दृष्टांत येथे दिला आहे.त्तम स्वयंपाक करणारी आहे आणि वाढणारीही उदार आहे आणि जेवणारे रस चाखणारे आहेत. अशा प्रसंगी जेवणारा, वाढणारा तृप्त असताे. महाराज, श्रीकृष्णाची अशीच अवस्था झाली आहे. अर्जुनाची ऐकण्याची इच्छा पाहून श्रीकृष्णांच्या बाेलण्यास आणखी जाेर चढला.अनुकूल वाऱ्याने जसे मेघ एकत्र जमतात, पाैर्णिमेच्या चंद्राने जशी समुद्राला भरती येते, तसे अर्जुनाच्या उत्सुकतेमुळे श्रीकृष्णाचे अंत:करण उचंबळून आले.