पत्र बारावे
अशा तऱ्हेने चाेवीस तत्त्वांची भरती हाेते. पंचवीसावे तत्त्व उरते ते म्हणजे पुरुष किंवा आत्मा हाेय.पुरुष किंवा आत्मा शुद्ध, नित्य व निरुपाधिक असताे.स्वत: ताे काहीही करत नाही. त्याच्या ठिकाणी प्रकाश व चैतन्य असतात. प्रकृती अचेतन असते. तिच्या ठिकाणी प्रकाश नाही. पुरुष हा पांगळा पण डाेळस. प्रकृती आंधळी पण पायाने सुदृढ. या दाेघांचा संयाेग झाला म्हणजे कार्य हाेऊ शकते. पुरुष व प्रकृती यांचा संयाेग झाला म्हणजे क्रिया सुरू हाेते. क्रिया सुरू झाली म्हणजे पुरुष काही करत नसतानाही ताे क्रिया करताे असा भास हाेताे, वास्तविक प्रकृती अचेतन आहे, पण तिच्याकडून क्रिया हाेत असल्यामुळे ती चेतन आहे, असा भास हाेताे.पंच कर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये, बुद्धी, मन व अहंकार आणि पंच तन्मात्रे अशा अठरा तत्त्वांचे सूक्ष्म शरीर बनते.
मरणाच्या वेळी फ्नत भाैतिक तत्त्वांचा नाश हाेताे. सूक्ष्म तत्त्वे वेगळा देह धारण करून परलाेकात जातात. सूक्ष्म शरीरात सत्त्वगुणाचे प्राधान्य असेल, तर ते उत्तम लाेकात जाते. सूक्ष्म शरीरात तमाेगुणाचे प्राधान्य असेल, तर ते अधम लाेकात जाते. सूक्ष्म शरीरात शुद्ध ज्ञान भरले असेल, तर सूक्ष्म देहाचे कवच फाेडून आत्मा माेक्षाप्रत जाताे.असे हे थाेड्नयात सांख्यदर्शनाचे सार आहे.तू सुखदु:खाबद्दल लिहिले आहेस. असा एकही मनुष्य नाही की ज्याला नुसतेच सुख मिळते किंवा ज्याला नुसतेच दु:ख मिळते. प्रत्येकाला सुख व दु:ख मिळते.तू असे लक्षात घे कीजाे दु:खाचा उपयाेग करून घेताे ताे शहाणा.
पुष्कळदा असे हाेते की, सुखाभाेवती दु:खाचे कवच असते. ते कवच काढून आपण सुख घेताे, पण ते सुख फार वेळ टिकत नाही. आपणाला वाटते की काहीतरी करून सुख टिकाऊ करता आले पाहिजे. त्या बाबतीत अनुभवाचे बाेल असे कीदु:खाचा जळणासारखा उपयाेग करून सुख उकळून काढले म्हणजे सुख टिकाऊ हाेते.तू उस पाहिला आहेस. उसाच्या रसाभाेवती चाेथा असताे.चाेथा काढून आपणाला रस मिळताे. पण रस टिकाऊ असत नाही. या चाेथ्याचे जळण करून रस उकळला म्हणजे गूळ तयार हाेताे. रसाच्या मानाने गूळ फार टिकाऊ असताे.सुखाच्या भाेवती जे दु:ख असते त्या दु:खाचा जळणासारखा उपयाेग करून आपण सुख उकळले म्हणजे सुख टिकाऊ हाेते.देवाचे नाम घेतले की, दु:ख जळू लागते व या जळणावर सुख उकळले की ते टिकाऊ हाेते.
तू आणखी असे लक्षात घे कीनाम जितके खाेल असते तितकी अधिक मन:शांती प्राप्त हाेते. दु:खाच्या वेळी आपण जे नाम घेताे ते सुखाच्या वेळच्या नामापेक्षा जास्त खाेल असते मनुष्याला दु:ख नकाे असते पण मानवी जीवन असे आहे की त्यात दु:ख येणारच.
अनुभवाचे बाेल म्हणून तू ध्यानात ठेव कीपरमार्थाच्या प्रांतात दु:खाचे भांडवल वापरून व्यापार केला म्हणजे जाे फायदा हाेताे त्याचे नाव सुख.तू आपल्या पत्रात लिहितेस- ‘‘ब्रह्म हे जगाचे उपादानकारण आहे असे म्हटले आहे.म्हणजे काय? उपादान कारण म्हणजे काय? मी असे वाचले आहे की या बाबतीत माेठा वाद आहे. त्या वादाचे स्वरूप काय आहे? गीता वाचून व इतर गं्रथ पाहून मला या बाबतीत फार औत्सु्नय वाटत आहे. तुम्ही कृपा करून थाेड्नयात मला समजावून द्या.’’