पाणी काय किंवा मन काय, त्यांचा स्वभाव आणि गती एकच आहे. दाेघेही स्वभावाने अधाेगामी आहेत पाणी जमिनीवर सांडले असता, जिकडे उतार असेल तिकडेच ते पळते. मनाची परिस्थितीसुद्धा यापेक्षा काही वेगळी नाही. मनसुद्धा नेहमी खालच्या दिशेलाच (संसार) धावते. तरीसुद्धा याची गती बदलली जाऊ शकताे. पाण्याला यंत्राची आणि मनाला मंत्राची साथ लाभल्यास दाेघेही उर्ध्वगामी हाेऊ शकतात (वरच्या दिशेने जाणारे). मन खालच्या दिशेने धावू लागले तर ‘संसार’ आहे आणि वरच्या दिशेने पळू लागले, तर ‘संन्यास’ आहे.