लक्षात ठेवा, असलं एकाकीपण नेहमी उदासपणा आणतं, एकांत आनंद आणताे. हा आनंद त्याचं लक्षण आहे. जर तुम्ही थाेडावेळ एकांतात राहिलात, तर तुमचा राेम-राेम आनंदलहरींनी भरून जाईल आणि तुम्ही थाेडावेळ जरी एकाकी राहिलात तर तुमचा राेम-राेम थकला-भागला, उदास काेमेजलेल्या पाना-फुलांसारखा हाेऊन जाईल. एकाकीपणात माणूस उदास हाेताे. कारण त्यावेळी दुसऱ्यांची आठवण येत असते. अन् एकांतात आनंद मिळताे कारण एकांतात प्रभू-मीलन हाेतं. ताेच आनंद आहे. आणखी काेणताही आनंद नाहीये.तेव्हा जर आपण एकाकी बसलात आणि आपणाला उदास वाटू लागलं तर हा काही एकांत नाही हे जाणा. तुम्हाला दुसऱ्यांची आठवण येत आहे. तर मग एकांत हुडका. आणि एकांताचा शाेध घेता येताे.
त्या एकांताला ध्यान म्हणा, नाम म्हणा, स्मरण म्हणा, सुस्ती म्हणा किंवा आणखी काही म्हणा ही सर्व एकांताचीच शाेधाशाेध आहे.
जिथं दुसऱ्याचं कुठलं अस्तित्व, कुठली रूपरेखा नसेल अशा ठिकाणी मी कसा पाेहाेचेन याचाच हा शाेध आहे. अन् जिथे दुसऱ्याची काहीही रूप-रेखा राहत नाही तेथे ‘स्वतःचीही’ रूपरेखा उरण्याचं काही कारण उरत नाही. सारं निराकार हाेऊन जातं. त्या निराकार क्षणांमध्ये ईश्वराचं ध्यान केलं जातं, त्याला जाणलं जातं, ताे जगला जाताे. ताे काही परिचय नाही की, मग आपण पृथक हाेऊन त्याला पाहत नाही.त्याच्याशी एकरूप हाेऊन त्याला जाणताे.स्वतंत्रपणे, दुरून, बाहेरून ओळखणे असा त्या जाणण्याचा प्रकार नाहीये.