चाणक्यनीती

09 Mar 2023 16:19:58
 

Chanakya 
 
वाच्यार्थ : (नेहमी) प्रवास करणारी व्यक्ती, बांधून ठेवलेला घाेडा, रतिक्रीडावंचित स्त्री, उन्हात वाळत घातलेले कपडे या गाेष्टी लवकरच जुन्या (वृद्ध) हाेतात.
 
भावार्थ : अकाली वृद्धत्वाकडे नेणाऱ्या गाेष्टी खालीलप्रमाणे - 1. प्रवासात राहणारी व्यक्ती : काही व्यक्ती नाेकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सतत प्रवास करतात. प्रवासात प्रदेश, हवा, पाणी बदलत राहते. बाहेरचे तेही वेळी-अवेळी खाणे, अपुरी झाेप आणि कामाचा शीण, आपल्या माणसांपासून दुरावा या आणि अशाच अनेक कारणांनी व्यक्ती प्रभावित हाेते. शरीरावर, तब्येतीवर या सर्वांचा (थशरी । ढशरी) परिणाम हाेऊन व्यक्ती वयापेक्षाही जास्त वृद्ध दिसू लागते. अनेक आजारही त्यांना जडतात.
 
2. बांधून ठेवलेला घाेडा : घाेडा हा उमदा प्राणी आहे. ‘पवन वेगाने’ उडणारा ‘चेतक घाेडा’, झांशीच्या राणीने ‘ेकला तटाहूनी घाेडा’ हे आपण ऐकून आहाेत.रईसजादे ‘रेस’ मध्ये धावणाऱ्या घाेड्यांवर सट्टा लावतात.
Powered By Sangraha 9.0