ओशाे - गीता-दर्शन

08 Mar 2023 14:50:45
 

Osho 
 
त्यामुळे ताे जास्तीत जास्त बेचैन झाला. भीम तितकासा बेचैन नाहीये.त्याला मित्र दिसतच नाहीयेत, शत्रू इतके स्पष्ट दिसताहेत, की आधी त्यांना खलास करणं याेग्य आहे, बाकीचं मग बघू अशी भीमाची भूमिका आहे, पण अर्जुन चिंतेने चूर हाेऊन दुःखात पाेळत आहे.कृष्णाचं हे सूत्र अर्जुनासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे.मित्र आणि शत्रू यामध्ये समभाव याचा अर्थ आहे, काही फिकीर करू नकाेस की काेण शत्रू आहे न काेण मित्र. दाेघांमध्ये तू तटस्थ हाे. ‘काेण आपलं ? काेण परकं ?’ या भाषेत विचार नकाे करूस.ही भाषाच चुकीची आहे. याेग्यासाठी निश्चितच चुकीची आहे. आणि गंमतीची गाेष्ट ही आहे की अर्जुनाला फ्नत युद्ध टाळण्यासाठी निमित्त पाहिजे हाेतं. त्याची सगळी जिज्ञासा नकारात्मक, निगेटिव्ह हाेती.
 
काहीतरी करून युद्ध टाळायचं हाेतं त्याला, पण कृष्णासारखा शिक्षक अशी संधी थाेडीच साेडणार हाेता ? कृष्णाची सगळी शिकवण पाॅझिटिव्ह आहे, हाेकारात्मक आहे. अर्जुनाच्या अंतरी याेगाला जन्म देण्यासाठी कृष्णाची सगळी धडपड आहे.काहीतरी करून युद्धामुळे हे जे दुःख मनात निर्माण झालं आहे ते टाळण्यासाठी युद्ध टाळलं तर बस्स.अशी अर्जुनाची भूमिका हाेती. त्याच्या या चिंतातुर क्षणांच्या संधीचा पुरेपूर फायदा कृष्णाने घेतला.अर्जुन चिंतामु्नत कसा हाेईल, यात कृष्णाला किंचितही स्वारस्य वाटत नाहीये. तर त्यानं निश्चिंत कसं व्हावं याबद्दल कृष्ण उत्सुक आहे.हा फरक नीट समजून घ्या. चिंतेपासून वाचणं ही गाेष्ट वेगळी. रात्री झाेपेच्या गाेळ्या, ट्रँ्निवलायझर घेऊनही आपण चिंतेपासून वाचू शकता. मद्य घेतलं की तरीही चिंतेपासून वाचू शकता.
Powered By Sangraha 9.0