मुखें बाेले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ।।2।।

06 Mar 2023 15:33:55
 
 
saint
 
आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना म्हणजेच स्वत:चे वर्तन अत्यंत चांगले ठेवून इतरांना मार्गदर्शन करणाऱ्यांना नकाे म्हटले तरी लाेक मान देतातच. अशांना लाेक केवळ डाेक्यावर घेत नाहीत, तर हृदयातही घेतात. हे सत्य असतानाही केवळ आपणाला धन आणि मान मिळावा म्हणून लाेकांना ब्रह्मज्ञान सांगत फिरायचे म्हणजे पाेपटपंचीपणा नव्हे तर काय ? पाेपट जे शिकवले ते बाेलताे. त्याला त्याच्या अर्थाशी, वर्तनाशी कांही देणे-घेणे नसते. अगदी संताप्रमाणे संतसाहित्यातील संदर्भ, अभंग, ओव्या जशास तशा मुखाेद्गत करायच्या आणि वर्तनशून्य ठेवून हाेय.
 
स्वत:च्या जीवनात याेग्य प्रकारे आचरण करून इतरांना आचरणातून सांगणाऱ्यांची समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. कमी प्रमाणात का हाेईना काही प्रवचन, कीर्तनकार असे आहेत की जे केवळ धन आणि मानासाठी प्रवचन, कीर्तन करीत असतात. अशा लाेकांमुळे चांगल्या प्रवचन, कीर्तनकारांना बऱ्याचवेळा लाेकांचे बाेलणे खावे लागते. असाे ज्ञानाेबा-तुकाेबा ज्याला खऱ्या अर्थाने समजले ताे आध्यात्मिक क्षेत्रात धन व मानासाठी कार्य करणार नाही, असे मला वाटते.
जय जय राम कृष्ण हरी - डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0