काेणी भाऊ, काेणी भावाचा नातेवाईक, काेणी मेहुणा, काेणी मित्राचा मित्र, असा सगळा गुंताडा हाेता. इकडे अन् तिकडे एकाच कुटुंबातील माणसं हाेती. काेण शत्रू अन् काेण मित्र हे स्पष्ट नव्हतं, सारं अंधुक हाेतं. त्यामुळेच अर्जुनाला चिंता लागली. त्याला वाटलं, ‘या आपल्याच मित्रांना, प्रियजनांना मारून एवढं माेठं राज्य मिळायचं असेल तर कृष्णा, हे सारं राज्य साेडून, मी निघून जाताे रानावनात. यापेक्षा मरणं, आत्महत्या करणं बरं. इत्नया मित्रांना, प्रियजनांना मारल्यानंतर राज्य मिळवून काय करू?’ हे क्षत्रिय बाेलला. हे क्षत्रियाचं मन आहे. दाेन कवडीचं राज्य, त्यासाठी मित्रांना, प्रियजनांना काय मारायचं? जे शत्रू - मित्रांची किंमत करतंय ते हे क्षत्रियाचंच मन बाेलत आहे.
तिकडेही आपलीच माणसं उभी आहेत. दुर्दैवाची गाेष्ट की, वाटणी अशी झाली आहे. असंच हाेणार हाेतं. कारण अर्जुनाचे मित्र ते दुर्याेधनाचेही मित्र हाेते. स्वतः कृष्ण माेठ्या अटकळीत वाटून उभा हाेता. कृष्ण इकडे तर त्यांचं सैन्य तिकडे काैरवांकडे उभे हाेते.
अजब लढाई हाेती. आपल्याच सेनापतीच्या विराेधात कृष्ण लढणार हाेता. तर तिकडे तीच गाेष्ट! कृष्णाशी लढायचं हाेतं ते त्याच्याच सेनापतींना, त्याच्याच सैन्याला.सगळी वाटणी प्रियजनांचीच हाेती. विवश हाेऊन काेणी इकडे अन् काेणी तिकडे. पण सगळेच बेचैन. तरी पण अर्जुन सगळ्यात जास्त बेचैन हाेता. कारण, असं म्हणता येईल की, त्या युद्धात अर्जुन सर्व क्षत्रियात जास्त शुद्ध क्षत्रिय हाेता.