चाणक्यनीती

06 Mar 2023 15:34:52
 
 

Chanakya 
वाच्यार्थ : दयाहीन धर्म, विद्याहीन गुरू, सतत भांडणारी पत्नी आणि स्नेहहीन नातेवाइकांचा त्याग करावा.
 
भावार्थ : काेणत्या गाेष्टी निरुपयाेगी व तापदायक आहेत ते येथे सांगितले आहे.
 
1. दयाहीन धर्म - जाे धर्म सहिष्णुता शिकवित नाही, इतरांचा सन्मान करायला शिकवित नाही; त्याचा त्याग करावा.ज्या धर्मात क्राैर्य शिकविले जाते, माणुसकीला काळिमा ासली जाते, ताे धर्म मुळी धर्मच नव्हे, ताे तर अधर्म! कारण ‘दया-क्षमा-शांती, तेथे देवाची वसती.’
 
2. विद्याहीन गुरू - ‘गुरू’ म्हणजे ‘माेठा.’ जाे ‘गुरू’ आहे त्याच्याकडूनच आपण शिकू शकताे. कारण आपण त्या एका विशिष्ट विद्येच्या बाबतीत ‘लहान’ असताे म्हणताे शिष्य बनताे; परंतु गुरूलाच जर ती विद्या येत नसेल, तर ताे खरा गुरू नव्हेच, त्याचा नि:शंक त्याग करावा.
Powered By Sangraha 9.0