गीतेच्या गाभाऱ्यात

06 Mar 2023 15:25:32
 
 
पत्र सातवे
 
 

Bhagvatgita 
जे देवाचे अनन्य भावाने चिंतन करतात, त्याची उपासना करतात, त्यांचा याेगक्षेम देव चालवताे. काही लाेक म्हणतात की, याेगक्षेम म्हणजे जेवणाखाण्याची व्यवस्था! तू असे लक्षात घे की न मिळालेली वस्तू मिळणे याचे नाव याेग व मिळालेल्या वस्तूचे संरक्षण करणे म्हणजे क्षेम.तू सत्तेबद्दल प्रश्न विचारला आहेस पण त्याबाबत असे लक्षात घे की, सत्ता संतांपुढे नसते.तुझा जाे परमार्थाचा प्रश्न आहे त्या बाबतीत असे म्हणता येईल की, देह प्रपंचाला वाहायचा आणि मन हरीला वाहायचे म्हणजे प्रपंचाचा परमार्थ हाेताे.तुझ्या पुढच्या प्रश्नाचे उत्तर असे की माणसाने चांगल्याची न्नकल करावी.रामायणात एक सुंदर गाेष्ट आहे. रावण कुंभकर्णाला म्हणाला की, ‘‘मी खूप खटपट करताे. परंतु सीता वश हाेत नाही. ती सारखी रामाचेच नाव घेते.’’ कुंभकर्ण रावणाला म्हणाला, ‘‘अरे साेपी गाेष्ट आहे. तू रामाचेच रूप घे म्हणजे सीता तुला वश हाेईल.
 
’’ रावण म्हणाला, ‘‘मी रामाचे रूप घेऊन पाहिले. पण रामाचे रूप घेतले की, माझ्या मनात विचार येताे की, दुसऱ्याच्या बायकाेला फसवायचे कसे?’’ या गाेष्टीचे तात्पर्य लक्षात घेण्यासारखे आहे.तू या पत्रात खूप प्रश्न विचारले आहेस. त्या बाबतीत असे म्हणता येईल की, मनात दुर्विचाराचा बिंदू उत्पन्न झाला म्हणजे दु:संगाने त्या बिन्दूचा जलाशय हाेताे तर सत्संगाने त्याची वाफ हाेऊन दुर्विचार निघून जाताे.यति आधिभाैतिक सुखावर आत्यंतिक तिलांजलि देताे आणि ययाति आधिभाैतिक सुखाचा अति उपभाेग घेण्याचा प्रयत्न करताे. यतिआणि ययाति यांच्या तत्त्वज्ञानात जाे अति भाग आहे ताे वर्ज्य करून आधिभाैतिक आणि आध्यात्मिक सुखाचा जाे याेग्य प्रमाणात समन्वय करताे ताे खरा सुखी हाेताे.सगळ्या ज्ञानाचे आगर, सगळ्या सुखाचे भांडार आणि सगळ्या तत्त्वज्ञानाचे सार भ्नती हेच आहे. म्हणूनच गीतेमध्ये श्रीगाेपालकृष्णांनी जास्तीत जास्त जाेर भ्नतीवर दिला आहे.
 
गंगेचे पाणी ते इतके मृदू असते की, डाेळ्यांत गेले तरी बुबुळांना खुपत नाही. पण ते इतके प्रखर असते की, खडकदेखील ते फाेडू शकते. वाणीने खडक फाेडणारे सत्य सांगावे पण ते सांगताना इत्नया माधुर्याने सांगावे की हृदयालादेखील शीतलता येईल.किरकाेळ सुखे पेरूसारखी असतात. तर माेठी सुखे नारळासारखी असतात. झाडावरून पेरू काढून ताे लगेच खाता येताे. पण नारळाचे तसे नाही. त्याच्यावर फार माेठे कवच असते. त्याच्या आत करटी असते आणि करटीच्या आत खाेबरे आणि पाणी असते. माणसाला नारळाची किंमत कळते.म्हणून ताे कवच आणि करटी काढून खाेबरे खाताे व पाणी पिताे. माकडाला नारळाची किंमत कळत नाही. नारळाच्या उंच झाडावर माकडे बसलेली असतात. त्यांना माणसे दगड मारतात व मग माकडे नारळ फेकतात. माेठ्या सुखाभाेवती दु:खाचे कवच असते त्यामुळे किरकाेळ माणसांना सुखाची किंमत कळत नाही. विचारी माणसांना सुखाची
Powered By Sangraha 9.0