कदाचित आपणास त्या गुहेची आठवणच नाहीये.कारण न जाणाे किती जन्म आपण बाहेर भटकंती करताे आहाेत आणि जेव्हा एकाकीपणा असताे तेव्हा त्यालाच आपण एकटेपण, एकांत असं समजताे. अन् तेव्हाही त्या एकाकीपणाला भरण्यासाठी सरसावून उपाय करताे. - सिनेमा, वृत्तपत्रं, रेडिओ. अन् असं काही सुचलं नाहीच तर झाेपी जाताे, स्वप्ने पाहू लागताे; पण काहीतरी करून एकटेपणाला चटकन भरून टाकायला सरसावताे.लक्षात ठेवा, असलं एकाकीपण नेहमी उदासपणा आणतं, एकांत आनंद आणताे.हा आनंद त्याचं लक्षण आहे. जर तुम्ही थाेडावेळ एकांतात राहिलात, तर तुमचा राेम- राेम आनंदलहरींनी भरून जाईल आणि तुम्ही थाेडावेळ जरी एकाकी राहिलात तर तुमचा राेम- राेम थकला-भागला, उदास काेमेजलेल्या पाना- फुलांसारखा हाेऊन जाईल.
एकाकीपणात माणूस उदास हाेताे.कारण त्यावेळी दुसऱ्यांची आठवण येत असते. अन् एकांतात आनंद मिळताे कारण एकांतात प्रभू-मीलन हाेतं. ताेच आनंद आहे.आणखी काेणताही आनंद नाहीये.तेव्हा जर आपण एकाकी बसलात आणि आपणाला उदास वाटू लागलं तर हा काही एकांत नाही हे जाणा. तुम्हाला दुसऱ्यांची आठवण येत आहे. तर मग एकांत हुडका. आणि एकांताचा शाेध घेता येताे.त्या एकांताला ध्यान म्हणा, नाम म्हणा, स्मरण म्हणा, सुस्ती म्हणा किंवा आणखी काही म्हणा ही सर्व एकांताचीच शाेधाशाेध आहे.जिथं दुसऱ्याचं कुठलं अस्तित्व, कुठली रूपरेखा नसेल अशा ठिकाणी मी कसा पाेहाेचेन याचाच हा शाेध आहे.