गीतेच्या गाभाऱ्यात

30 Mar 2023 14:17:25
 
 
पत्र दहावे
 
Bhagvatgita
लाइब्निझच्या मते (इ.स.1646 ते 1716) प्रत्येक वस्तू अध्यात्म अणूची बनलेली असते व या अणूची संख्या अगणित असते. माणसाला आत्मा असून त्याला दैवी श्नती असते. मनुष्याला उत्पन्न करून ईश्वर त्याच्याशी बराेबरीच्या नात्याने वागताे. राजा व प्रजा अथवा पिता व मुले यांच्यातील संबंधाप्रमाणे ईश्वर-मानव संबंध आहे. एखादा विशाल हेतू मनात बाळगून ईश्वराने जगाची निर्मिती केलेली दिसते.
लाॅकच्या मते (इ.स.1632 ते 1724) मानवाचे अज्ञान जरी अफाट असले, तरी देखील अंधारात वाट दाखविणाऱ्या छाेट्याशा मेणबत्तीच्या उजेडाप्रमाणे अज्ञानरूपी अंधकारात मानवामध्ये तेवत असलेल्या ज्ञानरूपी दिव्याचा उजेड त्याला ईश्वराचे दर्शन हाेण्यास पुरेसा हाेता. त्याच्या मते पदार्थाचे 3 प्रकार आहेत.(1) शारीरिक ऊर्फ जड पदार्थ (2) मानसिक पदार्थ ऊर्फ मन (3) दैवी पदार्थ ऊर्फ ईश्वर.
 
ताे म्हणताे आत्मज्ञान अन्त:स्फूर्त असल्यामुळे सर्वांत खरे असते.ईश्वरांसंबंधी ज्ञान निष्कर्षित पद्धतीचे असते. ते असे की ज्या अर्थी मी स्वत: अस्तित्वात आहे त्या अर्थी सर्व श्नितमान न सर्वज्ञ ईश्वराने मानवाची निर्मिती केली असली पाहिजे.ब्नर्लेच्या मते (इ.स.1685 ते 1753) ज्या अर्थी कल्पना कर्मणि स्वरूपाच्या (झरीीर्ळींश) असतात, त्या अर्थी एक कल्पना दुसऱ्या कल्पनेला जन्म देते, असे म्हणणे याेग्य नाही. त्या कल्पनांची प्रेरक श्नती दैवी श्नती असली पाहिजे. निसर्गनियम ईश्वरी श्नतीने निर्माण केलेले असतात, संवेदनांच्या रूपाने ईश्वर आपणाशी बाेलताे. आपण जे जे ऐकताे, पाहताे, स्पर्शिताे अथवा अन्य तऱ्हेने इंद्रियांद्वारजाणताे ते सर्व ईश्वराच्या सामर्थ्याचे प्रतीक असते.ह्यूम (इ.स.1711 ते 1776) च्या मते ईश्वर व नीती यांचे ज्ञान अनुभवाने मिळणाऱ्या समंजसपणामुळे वाढत जाते. ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरता जे तार्किक पुरावे मांडले जातात ते ताेकडे पडतात. त्या कामी श्रद्धाभावना, सहजप्रवृत्ती असल्या नैसर्गिक श्नती उपयाेगी पडतात.
 
जगात इतका दुष्टपणा, वाईटपणा आहे की, अशा जगाचा निर्माता ज्ञानसंपन्न, नीतिमान ईश्वर आहे, असे सिद्ध करता येणार नाही. निव्वळ वैचारिक भूमिकेवरून सत्यज्ञानाची प्राप्ती हाेणार नाही. यु्नितवाद जेव्हा लुळा पडताे, तेव्हा सहज प्रवृत्तीच्या याेगाने निसर्ग आपणावर कृपा करताे. आपले मत शाबीत करता येते, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवताे असे नसून विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नसते म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवताे, ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याकरता तर्काच्या आधारावर रचलेले पुरावे पुरेसे पडत नाहीत. त्या बाबतीत सहज प्रवृत्ती, श्रद्धा, भावना अशा नैसर्गिक श्नती उपयाेगी पडतात.प्लाॅटीनसच्या मते (इ.स.पूर्व 204 ते 269) अन्त:स्फूर्त भ्नतीच्या याेगाने ईश्वर-प्राप्ती हाेते, ईश्वर सर्वातील असून त्याचे स्वरूप अनाकलनीय आहे. ताे सृष्टीचा कर्ता नसून त्राता आहे.कॅटच्या मते (इ.स.1724 ते 1804) विवेक हा बाह्यवस्तूंचे प्रतिबिंब नसून प्राण आहे. काेपर्निकसने ज्याप्रमाणे खगाेल शास्त्रात क्रांती केली, त्याप्रमाणे आपण तत्त्वज्ञानात क्रांती केली, असे कॅट म्हणताे. मन निसर्गाला बनविते, हे त्याचे ब्रीद वा्नय आहे.
Powered By Sangraha 9.0