झालें लाेभाचे मांजर । पाेट भरे दाराेदार ।।1।।

29 Mar 2023 15:54:51
 
 

saint 
इतरांना देण्यासाठी स्वत:कडे असावे लागते, हे सत्य असले तरी स्वत:कडे किती व काय असावे हे निश्चित नाही. त्यामुळेच की काय थाेडेसे कांहीतरी पाठांतर करुन त्याचा खरा अर्थ जाणून न घेता अनेक वक्ते तेवढयाच पाठांतरावर किंवा पाेपटपंची अभ्यासावर व्यावहारीक दृष्टिकाेणातून श्राेत्यांना देतात. श्राेत्यांना समाधान मिळेल एवढे देणे ही आपली जबाबदारी आहे, असे न समजता आपण जे देताे ते श्राेत्यांनी स्विकारावे हा आपला अधिकार आहे, असे अनेक वक्ते समजतात.दर्देवाने अशा अर्धवट ज्ञान असलेल्या वक्त्यांना अनेक ठिकाणी मान सन्मानही मिळताे. भरपूर मानधनाबराेबर अशांची सेवा, काैतूक त्याचबराेबर उदाे-उदाेही हाेताे. त्यामुळे असे लाेक सामान्य लाेकांच्या भावनेशी सहजपणे खेळू शकतात.अशा लाेभी व व्यावहारिक वक्त्यांची वृत्ती मांजराप्रमाणे बनते. मांजर जसे दाराेदार पाेट भरण्यासाठी फिरते व जिथे मिळेल ते खाऊन पाेट भरते, त्याप्रमाणे असे वक्ते दाराेदार जाऊन आपले पाेट भरतात. हे सांगतांना तुकाराम महाराज म्हणतात, झालें लाेभाचे मांजर । पाेट भरे दाराेदार ।। जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊलीनिवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0