घराबाहेर लावला तर ताे इतरांच्या साेयीचा असताे. आपण कधी पाहिलं आहे का, की जेव्हा आपण दरवाजातून घराच्या आत जाताे तेव्हा बाहेरचा तुमच्या नावाचा साईनबाेर्ड तुम्ही छातीवर लावून आत जात नाही का? घर आपलंच आहे, तेव्हा साईनबाेर्डाची तिथे काहीच गरज नसते. ताे दरवाजावरच लटकवायचा असताे. बाहेरून जाणाऱ्या रस्त्यावरच्या लाेकांना इथं काेण राहतं ते कळावं यासाठी असताे. आपण आपला नामफलक छातीला लटकावून घरात कधीच शिरत नसता.आपण ज्याला मी, नाव-गाव, पत्ता- ठिकाण असं म्हणत असताे ताेही असाच एक छाेटा नामफलक (साईनबाेर्ड) असताे-जाे आपण दुसऱ्यासाठी लावलेला असताे.
जेव्हा अंतरीच्या एकांतात काेणी प्रवेश करताे तेव्हा ताे आत नेण्याची काहीच गरज पडत नसते. तिथं आपलीही काही गरज नसते.
आपणही तिथं शून्यच हाेऊन जाताे. त्या शून्यच हाेऊन जातात. त्या शून्यवत् एकाकार अवस्थेत प्रभूचं ध्यान केलं जातं. जंगला-वनात पळून जाऊन जाे एकांत मिळताे ताे हा एकांत नव्हे, हा एकांत अंतरी प्रविष्ट हाेणारा एकांत आहे.आणि कृष्णाने अर्जुनाला इथं जे सांगितलं आहे, ती याेगाची परम उपलब्धी, परमसीमा आहे. आपण अंतर्गुहेत कसा प्रवेश करावा यासाठीच तर समस्त याेग आहे. याेग हा अंतर्गुहेत प्रवेश करण्याचा विधी आहे आणि अंतर्गुहेत प्रवेश केल्यानंतर जे प्रभूचे ध्यान आहे, ताे आहे अनुभव, ती आहे प्रचिती, ताे साक्षात्कार आहे.प्रत्येकाच्या आत ती गुहा आहे; पण सारेच जण त्या गुहेबाहेर भटकताहेत, काेणी आत जात नाहीये.