निंदा माेटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके ।। थेंबें विरे वारेनि शाेखे । चिखलु जैसा ।। 13.667

29 Mar 2023 15:56:51
 
 

Dyaneshwari 
ज्ञानाची अठरा लक्षणे सांगितल्यावर त्यावाचून जे उरते, ते अज्ञान म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. ज्ञान एकदा स्पष्टपणे कळल्यावर त्याविरुद्ध असलेले अज्ञान आपाेआपच ध्यानात येते.दिवस संपल्यावर आपाेआपच रात्र येते. त्याप्रमाणे ज्ञान नसते, तेथे अज्ञान असते. तरीसुद्धा या अज्ञानाचे थाेडे वर्णन करताे. अज्ञानी मनुष्य मानाची वाट पाहताे. सत्काराने त्याला आनंद हाेताे.गर्वाने ताे ुगताे. ताे अज्ञानी समजावा. केलेल्या पुण्यकर्माची माळ ताे वाचारूपी पिंपळाला बांधताे. विद्येचा पसारा मांडून बसताे.केलेल्या सत्कर्मांची दवंडी पिटताे.स्वत:च्या अंगाला भस्म, गंध लाेकांना दिसेल अशा तऱ्हेने ासताे. लाेकांनी आपणांस पूज्य मानावे, म्हणून ताे त्यांना फसवताे. अरण्यात वणवा लागल्यावर ज्याप्रमाणे सर्व जीव जळून जातात, त्याप्रमाणे त्याच्या वागण्याने सर्व जगास दु:ख हाेते.
 
त्याचे सहज बाेलणे भाल्याप्रमाणे तीक्ष्ण असते. त्यांचे जगणे हिंसेचे घरच असते. भाता जसा ुंकल्याने ुगताे व वारा साेडल्याने रिकामा हाेताे, त्याप्रमाणे त्याची अवस्था लाभाने व हानीने हाेते. स्तुतीच्या वेळी ताे आनंदाने नाचताे आणि जराशी निंदा ऐकली, तर ताे कपाळ धरून बसताे.चिखल जसा पाण्याच्या एका थेंबाने विरघळताे व थाेड्याशा वाऱ्याने वाळताे, त्याप्रमाणे मानाने व अपमानाने त्याची स्थिती हाेते. त्याला विकाराचा वेग सहन हाेत नाही.ताे आतल्या गाठीचा असताे. त्याचे बाेलणे-चालणे वरून सरळ असले तरी ताे इतरांना फसवताे. पारधी जनावरांना चारा घालून जसे पकडताे, तशी त्याची इच्छा असते.शेवाळाने आच्छादलेली गारगाेटी वरून सुंदर दिसते किंवा पिकलेली लिंबाेळी सुरेख दिसते, तसे त्याचे बाह्य आचरण असते.
Powered By Sangraha 9.0