गीतेच्या गाभाऱ्यात

29 Mar 2023 15:45:02
 
 
पत्र दहावे
 
Bhagvatgita
 
जग हा ईश्वराचा आरसा आहे. माणूस हा साऱ्या विश्वाचे सार आहे. विश्व अमर्याद आहे. व शरीरातील अवयवाप्रमाणे सृष्टीतील साऱ्या वस्तू एकमेकांशी निगडित आहेत. प्रत्येक व्य्नती आपापल्या तऱ्हेने साऱ्या सृष्टीची छाेटी प्रतिमा असते.असे असले तरी मनुष्य उच्च प्रकारची रचना आहे.सर फॅन्सिस बेकनच्या मते (इ.स.1561 ते 1626) ईश्वरविषयक तत्त्वज्ञानाची उभारणी साक्षात्कार व तर्क अशा दाेन मार्गानी हाेते. त्याच्या मते तत्त्वज्ञानात तीन विषयांचा समावेश हाेताे. (1) ईश्वरविषयक (2) निसर्गविषयक (3) मानवविषयक.
मस हाॅब्सच्या मते (इ.स.1588 ते 1679) सर्व विषय यांत्रिक पद्धतीने हाताळले पाहिजेत. सृष्टीरचनेच्या बाबतीत जडद्रव्यवाद, ज्ञानाच्या बाबतीत संवेदनवाद, नीतीशास्त्राच्या बाबतीत सहज इच्छा-बद्धता वाद व राज्यशास्त्राच्या बाबतीत सहज धर्मवाद त्याने अंगीकारला.
 
त्याला असे वाटे की, यांत्रिक उपपत्ती सर्वत्र लावता येत असली तरी निसर्गातील असणाऱ्या ईश्वराला ती लागू पडत नाही.रेने देकार्त (इ.स.1596 ते 1560) जगरूपी पुस्तकाचा अभ्यास करण्याकरता देशाेदेशी पर्यटन करण्यास निघाला.इ.स. 1619 साली ऑस्टे्रलियातील न्यू-बर्ग येथे त्याचे मन कमालीचे बैचेन झाले व त्याला आत्मज्ञानाचा साक्षात्कार झाल्यानंतर त्याचे मन शांत झाले. त्याला पुस्तकी ज्ञानाची चीड हाेती. आपली सर्व पुस्तके जाळून टाकून प्रत्यक्ष निरीक्षण व प्रयाेग करून त्याने ज्ञानमिळविण्याचा उद्याेग चालू केला.एकदा एक गृहस्थ त्यांचेकडे आला आणि म्हणाला,तुमचे ग्रंथालय काेठे आहे. देकार्तने एक पडदा बाजूला केला व आतल्या बाजूला चिरफाड केलेली काेंबडी, झुरळे इ.पडलेली हाेती त्याकडे बाेट दाखवून ताे म्हणाला, ‘‘हे माझे ग्रंथालय.’’ ताे असे म्हणत असे की, माणसाच्या मनात अनंत, शाश्वत, सर्वसाक्षी, सर्वश्नतीमान अशा ईश्वराची कल्पना असते. ही कल्पना त्याच्या मनातून खास उद्भवलेली नाही. त्या कल्पनेचे कारण ईश्वराव्यतिर्नित काेणतेही असू शकणार नाही. म्हणून ईश्वर असलाच पाहिजे.
 
माणसाला आपल्या अपूर्णत्वाची जाणीव आहे. ही जाणीव परिपूर्ण पदार्थाशी तुलना केल्यानेच हाेणार, त्या अर्थी परिपूर्ण असा ईश्वर असलाच पाहिजे. ईश्वर परिपूर्ण व स्वत:सिद्ध आहे.माणसाच्या हीनत्वावरून जरी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध हाेत असले तरी माणसाचे अस्तित्व आधी व ईश्वराचे अस्तित्व नंतर, असा त्याचा अर्थ हाेत नाही. ईश्वर विदेही आहे.त्याचे अस्तित्व आधी आहे. व नंतर त्याने निर्माण केलेल्या माणसाचे अस्तित्व आहे. देकार्तच्या मते जगात 3 पदार्थ आहेत. (1) ईश्वर (2) मन (3) शरीर.स्पिनाेझाच्या मते (इ.स.1632 ते 1677) सत्य वस्तूचे 3 प्रकार आहेत. (1) पदार्थ (2) अंगभूत गुण (3) अंकुर पदार्थाला स्पिनाेझा ईश्वर असे नाव देताे. त्याच्या मते ईश्वर हा अखिल विश्वाचा अन्तस्थ हेतू आहे. ताे परिपूर्ण असल्यामुळे आधि-व्याधीपासून अलिप्त आहे. त्याने शून्यातून विश्व निर्माण केले ही धार्मिक कल्पना चुकीची आहे. याचे कारण ईश्वर म्हणजे साऱ्या सृष्टीतील सर्वव्यापी तत्त्व असून ताे सर्व वस्तुंची गाेळाबेरीज आहे.
Powered By Sangraha 9.0