राॅक अँड राेलच्या प्रशंसकांसाठी टीना टर्नरचे गाणे ‘व्हाट्स लव्ह गाॅट टु डु विथ इट’ काेणी सांगण्याची गरज नाही. खेळणी उत्पादक मेटल टाॅईजने या गाण्याच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त बार्बी डाॅलची खास आवृत्ती काढली आहे. या खास बार्बी डाॅलला टीना टर्नरचे रूप दिले आहे. टीना टर्नरसारखाच बार्बी डाॅलचा पाेशाख आहे. टीनाने उपराे्नत गाणे गाताना हा ड्रेस घातला हाेता. आता 82 वर्षांची असलेली ‘्नवीन ऑफ राॅक अँड राेल’ म्हणून प्रसिद्ध झालेली टीना टर्नरला ही बार्बी डाॅल पाहून खूप आनंद झाला. या बार्बी डाॅलची किंमत 55 डाॅलर (सुमारे 4,518 रु.) आहे.