पत्र दहावे प्लाॅटीनसच्या मते (इ.स.पूर्व 204 ते 269) अन्त:स्फूर्त भ्नतीच्या याेगाने ईश्वर-प्राप्ती हाेते, ईश्वर सर्वातील असून त्याचे स्वरूप अनाकलनीय आहे. ताे सृष्टीचा कर्ता नसून त्राता आहे.तुझ्या माहितीकरता असे सांगता येईल की, आरंभी ख्रिश्चन धर्म निव्वळ धर्म हाेता, त्यात तत्त्वज्ञानाची भर पडली नव्हती. ईश्वरावर विश्वास व येशूख्रिस्तावर श्रद्धा हे त्याचे सारसर्वस्व हाेते.ऑगस्टाईनने ख्रिस्ती धर्माची बांधेसूद बांधणी केली. इ.सनाच्या दुसऱ्या शतकात अॅपाॅलाॅजिस्ट पंथाच्या लाेकांनी ग्रीक तत्त्वज्ञान व ख्रिस्ती धर्मतत्त्वे एकच असल्याचे प्रतिपादन केले.ऑगस्टाईनच्या मते (इ.स.354 ते 430) मन ही निश्चित गाेष्ट आहे. मनाचे अस्तित्व नाकारता येत नाही.मनाच्या मागे जात जात ईश्वराचे अस्तित्व सिद्ध हाेते. ताे म्हणताे, ईश्वरभ्नतीमुळेच माणसाला माेक्ष प्राप्त हाेताे. येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीशिवाय माणसाला ईश्वराशी तादात्म्य पावता येते. कारण ईश्वर माणसाच्या अंतरंगात असताे.
एरिजेनाच्या मते (इ.स.810 ते 880) ईश्वर अनाकलनीय आहे. सृष्टी किंवा जड वस्तूमात्र व ईश्वर एकच आहेत. ईश्वरापासून दृश्य-स्थूल वस्तूपर्यंत अनेक श्रेणी आहेत व शेवटी सर्व ईश्वराप्रत जातात.अॅन्सेल्मच्या मते (इ.स.1033 ते 1109) ज्या अर्थी सृष्टी ही थाेडी फार सत्य वस्तू आहे, त्या अर्थी तिचे उत्पत्तीकारण पूर्णपणे सत्य असले पाहिजे व म्हणून ईश्वर असलाच पाहिजे. ज्या अर्थी माणसाला परिपूर्णतेची कल्पनाअसते त्या अर्थी परिपूर्णतेला अस्तित्व असलेच पाहिजे.अॅबेलाईच्या मते (इ.स.1079 ते 1142) वस्तूच्या सारखेपणात एकत्वाचे बीज आहे. हा सारखेपणा म्हणजेच ईश्वराने निर्मिलेल्या जाती हाेत. त्याच्या मते वस्तू-निर्मितीपूर्वी ती ईश्वराच्या मनातील संकल्पने असतात. त्याला असे वाटे की, ख्रिचन धर्म काेणतेही नवीन तत्त्व शिकवत नसून सर्व धर्मांचे सार आहे.
टाॅमस अॅ्निकनासच्या मते (इ.स.1234 ते 1274) धर्मश्रद्धेचे जग व भाैतिक-शास्त्रांचे जग ही वेगवेगळी आहेत.धर्मश्रद्धेचे जग हे भाैतिकशास्त्रांच्या जगाच्या पुढील टप्पा आहे. माणसाचा आत्मा हा त्या दाेहाेमधील दुवा आहे. ईश्वरी कृपा, शास्त्रीय ज्ञानाला विघातक नसून उलट त्याला पुढच्या पायरीला नेणारी आहे. ईश्वराचे अस्तित्व व ईश्वर सृष्टीसंबंध हे ज्याप्रमाणे धर्मशास्त्राचे विषय आहेत, त्याचप्रमाणे ते तत्त्वज्ञानचे देखील विषय आहेत. धर्मशास्त्राचा आधार साक्षात्कार आहे, वर तत्त्वज्ञानाचा आधार विचारश्नती आहे.
डन्सस्काेटच्या मते (इ.स.1270 ते 1308)ईश्वर इच्छिताे ते सर्व नि:श्रेयस असणारच. मनात येईल ते ईश्वर निर्माण करताे. ताे नीतिनियमांची देखील उलथापालथ करताे.जुना करार माेडून त्याने नवा करार केला.व्य्नितत्व, साक्षात्कार, इ. गाेष्टी ईश्वराच्या अगाध इच्छाश्नतीच्या निदर्शक आहेत. धर्मशास्त्राला तर्कशास्त्राचा आधार घेणे हास्यास्पदआहे. मनुष्याचे इच्छा स्वातंत्र्य ईश्वराच्या कृपेशी समरस हाेण्यात आहे.्नयूसाचा निकाेलस याच्या मते (इ.स.1401 ते 1440) निसर्गातील घडामाेडी ईश्वरी चमत्कार आहेत, ही भाेळीभाबडी कल्पना फेकून दिली पाहिजे.